महामार्गावरील वाहतूक वळवली;मलकापूर हद्दीतील छोटा भराव पूल पाडणार...
महामार्गावरील वाहतूक वळवली;मलकापूर हद्दीतील छोटा भराव पूल पाडणार...
कराड दि.18-(प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावरील मलकापूर नजीकचा आणखी एक छोटा पाचशे मीटरचा भरावाचा पूल उद्यापासून पाडण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक मलकापूर पुलावरून डाव्या सर्व्हिस रस्त्यावरून गंधर्व हॉटेल समोरून वळवण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहतूक महामार्गावर मलकापूर हद्दीत साई ट्रेडर्स समोरून पुन्हा हायवेवर येऊन पुढे कोल्हापूर बाजूला वाहने जातील तर कोल्हापूरहून येणारी व सातारा बाजूकडे जाणारी वाहने ही हॉटेल आसरा येथे सर्विस रोडने पुढे जातील व कोयना औद्योगिक वसाहती समोरून मलकापूर पुलावरून पुढे मार्गक्रमण करतील.
दरम्यान मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला पुढे जाण्यासाठी सर्विस रस्त्यावर प्रवास करण्यासाठी अन्य वाहनांची वाट पाहत उभे राहू नये व वाहनचालकांनी मलकापूर फाटा ते मळाई देवी पतसंस्था या दरम्यानचा डाव्या बाजूचा सर्विस रस्ता कमीत कमी वापरावा. जखिणवाडी नांदलापूर या परिसरातून उलट दिशेने या सर्विस रस्त्याने कोणीही वाहनचालकांनी प्रवास करू नये असे आव्हान कराड वाहतूक नियंत्रण शाखा व डीपी जैन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांनीही कराड परिसरातून महामार्गावरून शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. महामार्गावर येण्याचा कमीत कमी प्रयत्न करावा, त्यामुळे पालकांनी मुलांना परीक्षा केंद्रावर पर्यायी मार्गाने पोहोचवण्याची वेळेपूर्वी प्रयत्न करावा लागणार आहे.

Comments
Post a Comment