राहूल गांधी यांच्यावरील कारवाई;कराडात यूवक काॅंग्रेसची मूक निदर्शने....
राहूल गांधी यांच्यावरील कारवाई;कराडात यूवक काॅंग्रेसची मूक निदर्शने....
कराड दि.25-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने सुनावलेली शिक्षा व लोकसभेतून त्यांचे रद्द केलेले सदस्यत्व या चुकीच्या कारवाई विरोधात आज कराडत युवक काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुख निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात बॅनर, झेंडे घेऊन गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून मूक निदर्शने केली. आज संपूर्ण देशभरात राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कराडात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात युवक काँग्रेस कराड दक्षिणच अध्यक्ष दिग्विजय पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माळी, देवदास माने, अमित जाधव, राहुल पवार, अभिजीत पाटील, विक्रम पाटील, मुकुंद पाटील, अमोल नलवडे, शोहेब मुल्ला, धनराज शिंदे, विवेक चव्हाण, मयूर पाटील, जमाले, वैभव थोरात,भगवान सूतार,शब्बीर मूजावर,चेतन पाटील, विठ्ठल हूलवान, राम मोहिते, संग्राम काळभोर, डाॅ.विलासराव थोरात, शिवाजी जमाले, गणेश गायकवाड,गणेश सातारकर व इतर सहभागी झाले आहेत.
Comments
Post a Comment