देशात कोरोना संसर्ग वाढू लागला;अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 10 हजार पार.....

 


सातारा जिल्ह्यात आज 9 बाधितांची नोंद ...

कराड दि.28 (प्रतिनिधी) कोरोना संसर्ग पुन्हा वाढताना दिसू लागला आहे. देशभरात बाधितांची संख्या ही वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सातारा जिल्ह्यातही गेल्या पंधरा दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. सध्या अनेकांना हा संसर्ग झाला असून ते चाचणी करून न घेता वावरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग फैलावण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या सलग दोन वर्षात नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या चाचण्या केल्याने ही साथ आटोक्यात आली होती. मात्र आता पुन्हा या साथ रोगाने तोंड वर काढल्याने अनेक नागरिक केवळ गोळ्या औषधे घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात जाऊ लागले आहेत. मात्र कोरोना टेस्ट करण्यास नकार देत आहेत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.

दरम्यान आपणास याबाबत शंका आल्यास किंवा त्रास जाणवू लागल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात आपली कोरोना चाचणी करून घ्यावी जेणेकरून कोरोना संसर्ग फैलावणार नाही असे आव्हान कराड नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांनी केले आहे. अनेक जण केवळ औषधे घेऊन जातात शिवाय कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. सध्या संसर्ग फैलावत असून नागरिकांनी मास्क वापरावा असे ही कूलकर्णी यांनी शहरातील नागरिकांसाठी आवाहन केले आहे. 

सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 9 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या 16 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 7 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच 3 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.

नमूने-चाचणी-102 (एकूण-26 लाख 39 हजार 370)

आज बाधित वाढ- 9 (एकूण-2 लाख 80 हजार 782)

आज कोरोनामुक्त- 7 (एकूण-2 लाख 74 हजार 26)

आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728)

उपचारार्थ रूग्ण-16

गंभीर रुग्ण--0

रूग्णालयात उपचार -3

देशात गेल्या 24 तासांत 1573 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात एकूण 0 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 7 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 10 हजार 981 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

एक एप्रिलपासून औषधांच्या किमतीत होणार वाढ...

येत्या 1 एप्रिल पासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. आधीच महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा आता वाढणार आहे. औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक