आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने टेंभू गावासाठी 'क' वर्ग पर्यटनस्थळ मधून 60 लाखांचा निधी मंजूर...

 


आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने टेंभू गावासाठी 'क' वर्ग पर्यटनस्थळ मधून 60 लाखांचा निधी मंजूर...

कराड दि.25- माजी मंत्री व कराड उत्तरचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने क वर्ग पर्यटनस्थळ  (डि.पी.सी.) मधून टेंभू गावासाठी ६० लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. हे गांव कृष्णानदी तीरावर वसलेले असून थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगांव आहे. त्याचप्रमाणे या गावाशेजारी कृष्णानदीवर टेंभू उपसा जलसिंचनचा मोठा प्रकल्प कार्यान्वीत आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यामधील खानापूर, आटपाडीसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यातील गावांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा असल्याने या गावचे महत्व अनन्य साधारण आहे.

टेंभू गावास आ.बाळासाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न करून 'क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त करून घेतला आहे. त्यामुळे या गावामध्ये सबंध महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक येत असतात. त्यांना नागरी सुविधा मिळणेबाबत ग्रामपंचायत टेंभू व ग्रामस्थ यांची सातत्याने आ. पाटील यांच्याकडे मागणी होती. त्यास अनुसरून या गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे व सार्वजनिक चौकाचे सुशोभिकरण करणे या कामासाठी रक्कम ६० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे या गावचे वैभवात भर पडणार असल्याने या गावासह परिसरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान टेंभू गावचे विद्यमान सरपंच युवराज भोईटे यांनी आपल्या सहकारी सदस्यांच्या मदतीने गेल्या चार वर्षात विविध स्तरातून गावच्या विकासासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून तसेच आ. बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे गावात विकास कामे होऊ शकले आहेत व इथून पुढेही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याने व गावाला क वर्ग पर्यटन स्थळ मधून मिळणाऱ्या निधीतूनही गावचा विकास होणार आहे. त्यामुळे सरपंच भोईटे यांनीही आ. बाळासाहेब पाटील यांचे गावाच्यावतीने आभार मानले आहेत.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक