कराड-मलकापूरच्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज...


कराड व मलकापूरच्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज...

कराड दि.23-टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे  व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल. असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत तसेच त्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही तर अशा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी सुद्धा मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. 

आ. चव्हाण यांच्या या दोन्ही मागण्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारुंजी येथील प्रस्तावित बांधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती देत ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी टेंभू योजनेत गेल्या आहेत त्यांना सुद्धा पूर्ण मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल अशी माहिती दिली. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक