कराडजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे दहा जण जेरबंद;14 देशी बंदूका जप्त...

कराडजवळ दरोड्याच्या तयारीत असणारे दहा जण जेरबंद;14 देशी बंदूका जप्त...

कराड दि.28-(प्रतिनिधी) देशी बनावटीच्या बंदुकासह अन्य दरोड्याचे साहित्य घेऊन कराड जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दहा जणांना सातारा गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन 14 बंदूका, 22 जीवंत काडतूसे असा सव्वा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

या टोळीत कराड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे.सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी कराड), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी ता. कराड) , अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड),धनंजय मारुती वाटकर (रा.सैदापूर कराड), वाहीद बाबासाो मुल्ला (रा. विंग ता. कराड), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची कराड) या दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात आज पहाटे कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार राजमाची तालुका कराड गावच्या हद्दीत कराड विटा रोडवर जाणाई माळाई मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला उसाच्या शेतात काही संशियत असून ते दरोडे टाकण्याचे तयारीत आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी इतर कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आठ ते दहा जण असल्याचे दिसून आले. मात्र ते पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता तसेच त्यांच्या ताब्यातून 14 देशी बनावटीच्या बंदुका, 22 जिवंत काढतुसे मिरची पूड, कोयता, असा नऊ लाख 11 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कराड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे...पूढे वाचा...

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाने, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, वैभव सावंत, गणेश कापरे, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, नितीन येळवे, कुलदीप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई सहभागीय अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक