कराडात सोन्याची बिस्किटे विक्री करण्यास आणणाऱ्या तिघांना अटक...
कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी...बनावट सोन्याची बिस्कीटे 50 लाख रुपयांना विक्री करणेकरीता आलेल्या तिघांना अटक कराड, दि. 30 -दिनांक 29/07/2025 रोजी कराड शहरातील ज्वेलर्स मालक आसिफ अकबर मुल्ला यांना आरोपीत 1) गोविंद एकनाथराव पदातुरे वय 40 वर्षे, रा. भुतेकरवाडी ता. अहमदपुर जि. लातुर 2) सर्जेराव आनंदा कदम वय 36 वर्षे, रा. पिसाद्री ता. पन्हाळा जि. कोल्हापुर 3) अधिक आकाराम गुरव वय 50 वर्षे, रा. म्हासुर्णे ता. खटाव जि.सातारा यांनी आपसांत संगनमत करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन, दिशाभुल करुन खोटे बनावटीकरण केलेली 11 सोन्याची बिस्कीटे 50 लाख रुपयांना विक्री करायची आहेत असे खोटे सांगुन माझी फसवणुक करायचा प्रयत्न केलेला होता. सदरची माहीती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना मिळताच अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन गजानन हौसिंग सोसायटी गोवारे ता. कराड येथे नमुद आरोपीत यांना ताब्यात घेतलेले आहे. नमुद आरोपीत यांचेकडुन 550 ग्रॅम वजनाची बनावट बिस्कीटे जप्त केलेली आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुक...