सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार;शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार


सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार;शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक चेअरमन, व्हायचेअरमन पदाधिकारी युवा नेते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला

कराड, दि. 5 - पालकमंत्री शंभूराजे देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे कराड उत्तरचे शिवसेनेचे युवा नेते पै. संतोष वेताळ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याबद्दल सातारा जिल्हा शिवसेनेचे समन्वयक राजेंद्रसिंह यादव यांनी सर्वांचे आभार मानले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवली अनेक सुख सुविधांचा लाभ गोरगरीब गरजूंना दिला. त्यामुळे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व सर्वसामान्य माणसाला भावलं आहे. त्यामुळे अनेक जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत, येणाऱ्या भावी काळात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील त्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होईल असा आत्मविश्वास शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांनी यावेळी व्यक्त केला तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येईल तसेच कराड उत्तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल असा आत्मविश्वास कराड उत्तरचे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांनी व्यक्त केला

सर्वांचे आभार महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष सुलोचना पवार यांनी मानले गुलाबराव पवार यांनी प्रास्ताविक केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक