सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामेरी शाखेचे उद्घाटन

कामेरी : सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी आ. सत्यजित देशमुख. बाजूस डॉ. सुरेश भोसले, आ.डॉ. अतुलबाबा भोसले, देवराज पाटील, सम्राट महाडिक व अन्य मान्यवर.

सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामेरी शाखेचे उद्घाटन

कराड, दि. 26 : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था आदर्शवत कार्य करत आहेत. चांगला उद्योग समूह कसा चालतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृष्णा उद्योग समूह आहे, असे गौरवोद्गार शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी काढले. कामेरी (ता. वाळवा) येथे सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या २७ व्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. 

आ. सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पतसंस्थेच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, भाजपाचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. देशमुख पुढे म्हणाले, संस्था काढणे सोपे आहे पण त्या टिकवणे आणि उत्कृष्टपणे चालवणे अवघड असते. मात्र कृष्णा उद्योग समूहातील सहकारी संस्थांनी व्यवस्थापनात नवनवीन आयाम गाठले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही कृष्णा हॉस्पिटलचा नावलौकिक सर्वत्र आहे. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या काळात हजारो लोकांचे जीव वाचवले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना मोफत घरपोच साखरेबरोबरच उच्चांकी दरही दिला जात आहे. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ग्रामीण भागात जनतेच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी या संस्थांची स्थापना करण्यात आली. कामेरी गावाने नेहमीच आम्हाला मोठे सहकार्य केले. भक्कम आर्थिक पाया असणारी संस्था म्हणून जयवंतराव भोसले नागरी पतसंस्थेचा लौकिक असून, येत्या काळात कामेरी गावाला पतसंस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहकार्य करू.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, दरवर्षी आपल्या सहकारी संस्था पुरस्कार पटकावत आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी या संस्था आहेत. लवकरच आपली पतसंस्था १२०० कोटींचा व्यवसाय टप्पा गाठेल, याचा आम्हाला विश्वास आहे.

देवराज पाटील म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने असणाऱ्या संस्थेचा आलेख उत्कृष्ट आहे. संस्था चांगले काम करत आहे. संस्थेच्या कामकाजात आर्थिक शिस्त आहे. 

सम्राट महाडिक म्हणाले, भोसले परिवाराची संस्था असल्याने त्यावर लोकांचा मोठा विश्वास आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कृष्णा कारखाना, पतसंस्था व कृष्णा बँक भोसले परिवाराच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहे.

याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, कामेरीचे माजी सरपंच जयराज पाटील, छायाताई पाटील, प्रसाद पाटील, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, सुनील पाटील, शहाजी पाटील, संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हा. चेअरमन धनाजी जाधव यांच्यासह सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. रणजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्हा. चेअरमन धनाजी जाधव यांनी आभार मानले. 

पहिल्याच दिवशी ५ कोटींपेक्षा जास्त ठेवी

कामेरी गावातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी ५ कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी पतसंस्थेकडे सुपूर्त करत संस्थेवर विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ठेवीदार तसेच गावातील नागरिकांना पतसंस्था चांगल्या सुविधा देईल, अशी ग्वाही दिली. 



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक