रणजीतनानांच्या दातृत्वाला तोड नाही : आ. मनोज घोरपडे यांचे प्रशंसोदृगार
रणजीतनानांच्या दातृत्वाला तोड नाही : आ. मनोज घोरपडे यांचे प्रशंसोदृगार
समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा
कराड, दि. 23 - समाजात अनेक लोकांकडे प्रचंड पैसा आहे. पण समाजासाठी खर्च करण्याची दानत लागते. ही दानत रणजीतनाना पाटील यांच्याकडे असून त्यांचे आणि समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे, असे प्रशंसोदृगार आमदार मनोज घोरपडे यांनी काढले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटृर समर्थक, शिवसेना नेते सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक आप्पा माने, शिवसेनेचे विनायक भोसले, उद्योजक सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले की, रणजीत नानांच्या रुपाने मला सच्चा व जिवलग मित्र मिळाला आहे. शहरात मोठ्यांपासून लहानांपर्यंत त्यांचे सर्व स्तरात स्नेहाचे संबंध आहेत. छत्रपती संभाजी महाराज स्मारक व लिबर्टीचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही मोठी विकासकामे त्यांच्या अविरत धडपड व चिकाटीने मार्गी लागली. आपल्या उत्पन्नातील बराच भाग ते समाजासाठी खर्च करतात. आज वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ दहा हजार लोकांनी घेतला आहे. या सेवाभावी नेतृत्वाला समाजाने मोठे करावे.
विनायक भोसले यांनीही रणजीतनानांचे नेतृत्व कराडकरांनी मोठे करावे, असे आवाहन केले.
यावेळी कराडला देशपातळीवर स्वच्छतेत अव्वल आणण्यासाठी काम करणारे आरोग्य कर्मचारी, मुकादम, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार देवदास मुळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिला रिक्षा चालक मंगल आवळे यांचाही सत्कार करण्यात आला.
शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त सकाळपासून कराड शहर तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर मान्यवरांनी रणजीत नानांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, अँड. उदयसिंह पाटील, मंगेश चिवटे, सत्यनारायण मिणीयार यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार आनंदराव पाटील, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कार्यकारी संचालक दिलीप गुरव, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, माजी नगरसेवक अरुण जाधव, सुहास पवार, इंद्रजित गुजर, अतुल शिंदे, स्मिता हुलवान, अड. मानसिंगराव पाटील, श्रीमती कुसुम पवार, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे, राजेंद्रआबा यादव, माजी सभापती राजू कदम, महेश चव्हाण, दक्ष कराडकर चे प्रमोद पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत माने व सदस्य, श्रीमती यांच्यासह प्रत्यक्ष भेटून रात्री उशिरापर्यंत रणजीत नानांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.


Comments
Post a Comment