श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिनवाडी तर्फे वाहन वितरण
श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिनवाडी तर्फे वाहन वितरण सोहळा
कराड, दि. 8 अशोकराव थोरात भाऊ शेती मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वाहन तारण कर्ज वितरण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी वाहनाचे पूजन संस्थेचे संचालक शामराव सखाराम पवार व सल्लागार दत्तात्रय आबा लावंड यांच्या हस्ते करण्यात आले. कमी व्याज दर या योजने अंतर्गत वाहनाचे वितरण करण्यात केले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात भाऊ म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वत्र वाहन विक्री वाढत आहे सर्वसामान्य नागरिकांना दुचाकी चार चाकी वाहन खरेदीसाठी 12% व्याजदराने त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने केली आहे.
सदर योजनेचा लाभ संस्थेच्या सोमवार पेठ व शास्त्रीनगर शाखेतील कर्जदार यांनी घेतला. वाहने ही सर्वसामान्यांची गरज झाली आहे. दुचाकी व चार चाकी वाहनाचे देशात उत्पन्न वाढत आहे व खरेदी ही वाढत आहे. संस्थेच्या सभासदांना वाहने खरेदी करण्यासाठी ही प्रोत्साहन पर योजना आखली आहे तरी या योजनेचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा.
श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 283 कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेस सन 2024- 25 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 4 कोटी 19 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे.
व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यात ही संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहण्यासाठी संस्थेने एनपीएची तरतूद सहकार कायद्यानुसार पूर्ण केलेली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्था लाभांश देणार आहे असे संस्थेचे चेअरमन अजित थोरात काका व अर्थशास्त्र व्हॉइस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे यांनी नमूद केले त्याचबरोबर सर्व शाखातून लॉकर सुविधा निर्माण करण्याचा मानस चेअरमन यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन घडामोडी माहित व्हाव्यात म्हणून नेहमी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. संस्थेच्या सर्व शाखा संगणकृत असून कोअर बँकिंग प्रणाली लागू करून सभासदांना ऑनलाइन सेवा, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच संस्थेच्या एकूण शाखा पैकी 17 शाखा स्वमलकीच्या इमारतीत आहेत.
देशात व महाराष्ट्रात सहकार क्षेत्र खाजगीकरणामुळे अडचणी येत आहे, अशावेळी संस्थेच्या सभासदांनी व इतर गरजू नागरिकांनी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून व्यवहार करावे असे आव्हान याप्रसंगी संस्थेचे चेअरमन अजित थोरात काका यांनी केले तसेच संस्थेचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी नवीन उपक्रम सुचवले याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे, संस्थेचे संचालक व सल्लागार मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव शिंदे, शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment