प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले....
कराड : सायकलस्वारांचा सत्कार करताना भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले.... प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले.... उद्यान विभागाची पाहणी; ऐतिहासिक महत्व टिकविणार... कराड, दि .29: कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणच्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट, हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने, प्रीतिसंगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. प्रीतिसंगम घाट परिसराच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन, या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. याची माहिती घेऊन डॉ. भोसले यां...