महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने चालण्याची आज गरज: रमाकांत खलप...

 


महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने चालण्याची आज गरज: रमाकांत खलप...

अशोक जैन स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने सन्मानित...

उंडाळे दि.18-स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले.यामध्ये अनेकांनी देशासाठी बलिदान दिले.या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांची अहिंसेच्या मार्गाने उभारलेला लढा हा सर्वश्रेष्ठ ठरला आहे.गोळीला गोळीने उत्तर देता येते मात्र अहिंसेच्या मार्गाने उपोषणाला उपोषणाने उत्तर देता येत नाही.म्हणूनच अहिंसेचा मार्ग हीच भारताची खरी शक्ती आहे. देशात स्वातंत्र्य संग्राम चळवळी पासून आजपर्यत त्याग करणाऱ्या काही मोजक्या कुंटुंबाचा उल्लेख केला जातो त्यामध्ये उंडाळकर कुंटुंबाबियांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरउदगार गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी काढले.

थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी जैन इरिगेशन समूहाचे प्रमुख अशोक जैन ,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना महेश शिंदे, अँड उदयसिंह पाटील उंडाळकर,मनोज घोरपडे,जेष्ठ नेते दादासाहेब गोडसे, रफिकशेठ बागवान, अँड विजय पाटील,मनोहर शिंदे रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा धनाजी काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रमाकांत खलप म्हणाले, गोवा स्वातंत्र्य करण्यासाठी महाराष्ट्रतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे मोलाचे योगदान आहे. यामध्ये कराड सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर मधील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. महाराष्ट्रातील थोर स्व यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आम्ही गोवा राज्यात सामाजिक कार्य करत आहे.तसेच देश पातळीवर नदी जोड प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडली असताना .देशात स्व विलासकाका पाटील यांनी राबवून नदी जोड प्रकल्प राबवून आपल्या समाजप्रित भावना दिसून आले.स्वातंत्र्य पूर्व काळात व नंतर ही समाजासाठी झटणारे स्वा सेनानी दादा उंडाळकर ,स्व विलासकाका उंडाळकर यांच्या नंतर त्यांच्या विचारांचा वारसा अन वसा पुढे नेटाने नेणारे अँड उदयसिंह पाटील उंडाळकर ही तिसरी पिढी कार्यरत आहे.आजही स्वातंत्र्य लढ्याचे आठवणीला व विचाराला व्यासपीठ निर्माण करून तरुण पिढी पुढे आदर्श ठेवला आहे.

अशोक जैन म्हणाले ,महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खेडी सुधारली तर देश सुधारेल या सदभावनेतून खेड्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशन ने काम केले आहे.एक दाणा पेरला तर हजारो दाणे पदरात पडतात एक थेंब वाचवला तर हजारो थेंबाचे दान पडते एक झाड मायने वाचवलं तर हजारो लाखो पानाच्या सावलीने प्राणिमात्राचे जीवन मिळत असते. 

सामाजिक बांधिलकी ठेवून जैन उद्योग समूह शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे. पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर आम्ही महाराष्ट्रात जोडलो. टिशू कल्चर आणि जी केळी फक्त भारतामध्ये तामिळनाडूमध्ये होत होती महाराष्ट्रात जळगाव जिल्हा आणि नांदेड मध्ये होत होती. आज पश्चिम महाराष्ट्रात केळी खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन एक्सपोर्ट करत आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुख समृद्धीने

 शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करणेत यश आले.

अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर प्रास्ताविक व स्वागत करताना म्हणाले, काकांनी उंडाळे येथे समाज प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. यातून माणूस वैचारिक सक्षम बनवला काकां आज आपल्यात नाहीत मात्र त्याचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. काकांनी सुरु केलेले काम अखंडपणे सुरू ठेवण्याची भूमिका स्मारक समितीने घेतली आहे. यापुढील काळात ही काकांचे काम आम्ही तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवणार आहोत . स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला व आपणाला स्वातंत्र्य व लोकशाही मिळवून दिली ती टिकवण्याचं काम युवकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.    

यावेळी माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते अशोक जैन यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप, मानपत्र स्मृतीचिन्ह रोख रक्कम 51 हजार अशी होती.राजेंद्र शेलार यांनी मानपत्राचे वाचन केले तर आभार गणपतराव कणसे यांनी मानले.

अशोक जैन यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप, मानपत्र स्मृतीचिन्ह रोख रक्कम 51 हजार असे होते.यावेळी जैन यांनी दादा उंडाळकर स्मारक समितीने चालवलेल्या स्वातंत्र्यसैनिक व

समाजप्रबोधना च्या उपक्रमास जैन समूहाच्या रक्कमेत आणखी 5 लाख 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक