कराड शहर डीबी पथकाने रोखली चेन स्नॅचिंग...धारधार शस्त्र व मुद्देमालासह एकास अटक...
कराड शहर डीबी पथकाने रोखली चेन स्नॅचिंग...धारधार शस्त्र व मुद्देमालासह एकास अटक...
कराड दि.9-मलकापूर ढेबेवाडी फाटा दरम्यान चाकुचा धाक दाखवुन महिलेच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावुन घेवनु पळून जाणाऱ्यास कराड शहर डीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल व धारदार शस्त्र जप्त केले आहे. सुरेश सिध्दाप्पा दौडमणी वय (30 वर्षे) रा. कोयना वसाहत ता. कराड असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कराड शहरात होणाऱ्या चैन स्नॅचिंगचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्यते मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कराड शहराचे वेगवेगळया भागात पथक तयार करुन प्रतिबंधक गस्त करीत होते.
काल आठ फेब्रुवारी रोजी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच उप नगरात चैन स्नॅचिंगचे अनुषंगाने प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे गोपनीय बातमीदाराने मलकापुर ते ढेबेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर एक इसमाने चाकुचा धाक दाखवुन महिलेच्या गळयातील सोन्याची चैन हिसकावुन घेवनु पळाल्याचे माहिती दिली असता वपोनि पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे हे तात्काळ घटनास्थळी रवाना होवुन आरोपीचा पाठलाग करून त्यास नागरीकांचे मदतीने शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण 30,000/- रुपये किंमतीची अर्ध्या तोळयाची सोन्याची चैन व धारधार शस्त्र जागीच जप्त करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.
राजू सनदी कराड



Comments
Post a Comment