आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यात तीन कोटींच्या कामांना मंजुरी...
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यात तीन कोटींच्या कामांना मंजुरी...
कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून होणार कामे ; १४ कामांचा समावेश...
कराड, दि .19: शासनाचे विविध योजनांचे निधी आणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्याची दृष्टी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असल्याची प्रचिती जनतेने अनेकदा घेतली आहे. त्यांच्या विकासाच्या नजरेतून नुकताच मतदारसंघातील १४ विविध कामांना तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून ही कामे मंजूर झाल्याचे राज्याचे उपसचिव तथा कोयना भूकंप पुनर्वसन समितीचे सचिव डॉ. सत्यनारायण बजाज यांनी दिलेल्या मंजूरी पत्रात नमूद केले आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गत दोन महिन्यांपूर्वी कराडच्या विमानतळासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्याचबरोबर मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल व कोडोली ते श्री क्षेत्र पाचवडेश्वर येथील महत्वाकांक्षी पुलासाठी त्यांनी सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या दोन पुलांच्या माध्यमातून कृष्णाकाठ आणि कराड दक्षिणेतील डोंगरी भागांचे दळणवळण सुलभ होणार आहे.
कायम मतदारसंघ आणि जनतेच्या विकासाची पेरणी सुरू ठेवण्याचा विचार घेवून आ. पृथ्वीराज चव्हाण कार्यरत आहेत. याच विचाराच्या दृष्टीतून त्यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून मंजूर झालेली कामे व तरतूद निधी असा ; येरवळे येथील जिल्हा परिषद शाळेत खोली बांधण्यासाठी १२ लाख रुपये, वहागाव येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी ४८ लाख रुपये, घोणशी येथील दोन शाळा खोल्यांसाठी २४ लाख रुपये
गोंदी येथे एक शाळा खोली व इतर भौतिक सुविधा उभारण्यासाठी २० लाख रुपये, शेणोली येथील विलास धर्मा गायकवाड यांच्या घरा (कराड - तासगाव रोड) पासून बाळासाहेब हरिबा आगलावे यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, आगाशिवनगर (मलकापूर) येथे दोन शाळा खोल्या बांधण्यासाठी २४ लाख रुपये, जखिणवाडी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १३ लाख रुपये, जुजारवाडी येथील शाळा खोली बांधण्यासाठी १२ लाख रुपये
पाचवडवस्ती येथील स्मशानभूमी सुधारणा करणेसाठी ३० लाख रुपये, आणे येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी ४८ लाख रुपये, वारुंजी येथील जिजामातानगर येथे शाळा खोल्या बांधण्यासाठी २४ लाख रुपये, घारेवाडी येथील वाटवले वस्ती येथे साकव पुलाच्या दोन्ही बाजूस सुधारणा करणेसाठी १० लाख रुपये, नारायणवाडी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये तसेच शेरे येथील आनंदराव (पिंटू) पवार यांच्या घरापासून नदी पणवठ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामासाठी १० लाख रुपये असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Comments
Post a Comment