खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधी मंजूर...


खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधी मंजूर...

कराड दि.21-खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सातारा, जावली, कोरेगाव, खटाव, कराड व पाटण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरा मिळाली आहे. त्यामुळे सदर गावातील विकासकामे मार्गी लागून स्थानिक विकासात भर पडणार आहे.

खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदार संघात विविध शासकीय योजनेतून भरीव निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे गावोगावच्या विकासाला चालना मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरा मिळाली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील शिवथर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे १० लक्ष रूपये, जावली तालुक्यातील भिवडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, खटाव तालुक्यातील वेटणे येथे जलशुध्दीकरण यंत्रणा बसविणे १० लक्ष,

कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथे अंतर्गत रस्त्ता करणे ५ लक्ष, भाटमवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, वडाचीवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, नलवडेवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष.

कराड तालुक्यातील कालगाव येथे प्राथमिक शाळेस क्रीडा साहित्य देणे ५ लक्ष, नांदलापूर येथे शाळेची इमारत खोली बांधणे १० लक्ष, पाडळी केसे येथे अंतर्गत रस्ता करणे ८ लक्ष, शिंदेवाडी (कोळेवाडी) येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष.

पाटण तालुक्यातील डिगेवाडी येथे व्यायामशाळा करणे १० लक्ष, पापर्डे येथे सांडपाणी व्यवसथापनासाठी गटर्स व कॉंक्रिटीकरण रस्ते बांधणे १० लक्ष रुपये, चेवलेवाडी (नेरले) येथे अंतर्गत रस्ते करणे १० लक्ष, नेरळे येथे अंतर्गत रस्ते करणे १० लक्ष रुपये असा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याने स्थानिक विकासकामे मार्गी लागणार आहेत.

राजू सनदी कराड टुडे न्यूज 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक