मोटरसायकल चोरी प्रकरणी कराडच्या एकास अटक;कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी...
मोटरसायकल चोरी प्रकरणी कराडच्या एकास अटक;कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी...
कराड दि.16-कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेने शेनोली स्टेशन ता. कराड येथून चोरीस गेलेली हिरो होंडा पॅशन मोटरसायकल कराड शहरातील आरोपीकडून हस्तगत करत त्यास अटक केली आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 21 जानेवारी 2024 रोजी रात्रौ शेणोली स्टेशन ता.कराड येथील सोनहिरा पेट्रोलपंपावर पार्क केलेली हिरो होंडा कंपनिची, पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH-11-AZ-1639 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेहली म्हणुन दिलीप यशवंत कणसे रा.विंग ता.कराड यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, वहातुक विभागाचे पो. हवा. प्रकाश कारळे यांनी लगेच सीसीटिव्ही फुटेजवरुन संशयीत आरोपी मनोज रतनचंद ओसवाल रा. 52, शुक्रवार पेठ कराड यांचेकडुन पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH-11-AZ-1639 एकुण किं. 20000/- रुपये ही हस्तगत करुन जप्त करण्यात आली आहे.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, कराड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, वहातुक विभागाचे पो. हवा.प्रकाश कारळे यांनी केली असुन पुढील तपास पो. हवा. शंकर गडांकुश हे करीत आहेत.

Comments
Post a Comment