कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य; पालकमंत्री शंभुराज देसाई..
कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य; पालकमंत्री शंभुराज देसाई.. सातारा दि. 30-एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणा बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, कराड विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई आदी उपस्थित होते. कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात 2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी 1 हजार 280 ...