कराडात शिवसेना ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा घेणार; इंद्रजीत गुजर (कॅप्टन).....
कराडात शिवसेना ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा घेणार; इंद्रजीत गुजर (कॅप्टन)...
कराड दि.14 (प्रतिनिधी) कराडात लवकरच युवा संवाद मेळावा घेण्यात येईल असे आश्वासन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर (कॅप्टन) यांना दिले. खासदार राऊत व गुजर यांची येथील हॉटेल महिंद्रा वर बैठक झाली त्यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती इंद्रजीत गुजर यांनी दिली.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे कार्यक्रमानिमित्त येथे आल्यानंतर हॉटेल महिंद्रा वर शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर (कॅप्टन) यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी गुजर यांनी शिवसेनेच्या कराडात होणाऱ्या आगामी विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराडात युवा संवाद मिळावा घेण्यात यावा अशी मागणी केली, त्यावर राऊत यांनी लवकरच आपण या युवा संवाद मेळाव्याचे भव्य आयोजन कराड येथे करू असे आश्वासन दिले.
शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर (कॅप्टन) यांनी यावेळी खा. संजय राऊत यांचे स्वागत केले.
राजू सनदी, कराड


Comments
Post a Comment