कराड तालुका मतदार नोंदणीत राज्यात अव्वल; प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे...

कराड तालुका मतदार नोंदणीत राज्यात अव्वल; प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे...

कराड दि.23 (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुका प्रशासनाने कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात मतदार यादी अद्यावत करण्यामध्ये बीएलओ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत कराड तालुक्याने राज्यात अव्वल कामगिरी केली असल्याची माहिती प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान कराड तालुक्यात मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारतीय निवडणूक आयोगाने कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्यांचा उद्या मुंबई येथे आयोगाच्या वतीने सन्मान होणार आहे.

कराड तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून 1 लाख 22 हजार 115 प्राप्त अर्जातून 1 लाख 13 हजार 519 अर्ज मंजूर केले असुन दोन्ही मतदारसंघात 36 हजार 122 नव मतदारांची नोंदणी केल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते. प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी राजकीय प्रतिनिधी तसेच बीएलओ व मतदान केंद्रावर सुपूर्द करण्यात आली असून त्या नागरिकांना पाहण्यास मिळतील.

भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी 1 जून 2023 पासून सुरू होऊन 5 जानेवारी 2024 रोजी समाप्त झाली. या कार्यक्रमात मतदार यादीत नावे वाढवणे, नवीन मतदार नोंदणी करणे, स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळणे तसेच नावात दुरुस्ती करणे याबाबत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बीएलओंच्या मदतीने 1 जून 2023 ते आज अखेर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कामात कराड तालुक्यात अतिशय उत्तम कामगिरी केली असल्याची माहिती ही यावेळी म्हेत्रे यांनी दिली

कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात 647 बीएलओ व 75 सुपरवायझर यांनी उत्कृष्ट पद्धतीने या मतदार नोंदणी कार्यक्रमात प्रशासनाला सूचनेनुसार काम केल्याने राज्यात अव्वल कामगिरी कराड तालुक्याची झाली आहे. बीएलओ, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन नोंदणी केली आहे.

कराड उत्तर मतदार संघातून 60 हजार 350 अर्ज प्राप्त झाले असून 55 हजार 520 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर कराड दक्षिण मतदार संघात 61 हजार 765 अर्ज प्राप्त झाले असून 57 हजार 999 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मतदार नोंदणी बाबत प्राप्त दावे हरकती निर्गती करून अंतिम मतदार यादी दिनांक 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून नोंदणी झालेल्या मतदारांची ओळखपत्रे पोस्टाने पाठवल्याचे ही यावेळी प्रांताधिकारी मेहत्रे यांनी सांगितले. 

कराड उत्तर मतदार संघात मतदार यादीत नावे वाढवणे तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे कार्यक्रमात 16 हजार 625 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मयत व स्थलांतरित असे 34 हजार 1 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय 4 हजार 894 मतदारांची नावांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

कराड दक्षिण मतदार संघात मतदार यादीत नावे वाढवणे तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे कार्यक्रमात 19 हजार 497 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत मयत व स्थलांतरित असे 33 हजार 10 अर्ज मंजूर झाले आहेत याशिवाय 5 हजार 492 मतदारांच्या नावांची यादीत दुरुस्ती करण्यात आली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची 4 लाख 30 हजार 869 लोकसंख्या असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची 4 लाख 367 एवढी लोकसंख्या आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 93 हजार 154 मतदार संख्या असून 1 लाख 49 हजार 765 पुरुष तर 1 लाख 43 हजार 382 स्त्रिया मतदार आहेत. या मतदारसंघात 338 मतदान केंद्रे आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात 2 लाख 98 हजार 303 मतदार संख्या असून 1 लाख 52 हजार 587 पुरुष तर 1 लाख 45 हजार 691 स्त्रिया मतदार आहेत. या मतदारसंघात 309 मतदान केंद्रे आहेत.

कराड उत्तर मतदार संघात 2 हजार 44 सैनिक मतदार असून कराड दक्षिण मतदार संघात 672 सैनिक मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघात एकूण 32 तृतीयपंथी मतदार आहेत.

राजू सनदी कराड 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक