कराडात गुरुवारी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन;मुख्याधिकारी शंकर खंदारे...


कराडात १ फ़ेब्रुवारीला महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन;मुख्याधिकारी शंकर खंदारे...

कराड दि.29- शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे होत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि- १ फ़ेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाउन हॉल) येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दि- १ रोजी सकाळी ११ वाजता कराड शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा मधिल विद्यार्थ्याचे शिवरायांच्या जिवनावरील ऐतिहासिक प्रसंग व पोवाडे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच सांयकाळी ६ वाजता जागर लोककलेचा हा लुप्त होत चाललेल्या कलांचा कला अविष्कार सादर करण्यात येणार असुन या मध्ये प्रामुख्याने पोवाडा, भारुड, गोंधळ इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. वरील दोन्ही कार्यक्रम टाऊन हॉल येथे होणार असुन, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधिक्षक समिर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक