कराडच्या कृष्णा कृषी महोत्सवात सापडले अकरा हजार रुपये....
कृषी प्रदर्शनात सापडलेले ११,००० रुपये व कागदपत्रे असलेले पाकीट स्वागत कक्षाच्या माध्यमातून परत....
कराड दि.20: कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी व औद्योगिक प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले हजारमाची येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. बाजीराव पाटील यांचे पैसे व कागदपत्रे असलेले पाकीट स्वागत कक्षाच्या माध्यमातून परत देण्यात आले.
प्रदर्शन पाहत असताना श्री. पाटील यांचे पडलेले पाकीट कार्वे (ता. कराड) येथील फोटोग्राफर दिपक थोरात यांना सापडले. सदर पाकीट त्यांनी स्वागत कक्षामधील कृष्णा बँकेचे श्री. पोपट देसाई यांच्याकडे जमा केले. सापडलेल्या पाकीटामध्ये 11,000 रुपये व कागदपत्रे होती. सदरचे पाकीट त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी अलाउन्सिंग व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले.
सदर पाकीट योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहच करण्यासाठी पोपट देसाई, अधिकराव पाटील, दिपक थोरात, रामभाऊ सातपुते, प्रशांत मोहिते, सुनील पवार, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment