सातारा जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या...
सातारा जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या... कराड शहर पोलीस ठाणे, वाहतूक शाखा अधिकाऱ्यांच्या बदल्या...
कराड- दि.14-सातारा जिल्हा पोलीस अंतर्गत काही अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पारित केले आहेत. त्यानुसार कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारा येथे तर कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख चेतन मछले यांची मल्हारपेठ पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहेत.
कराड तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांची बदली सातारा शहर पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. कराड शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांची कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेत बदली करण्यात आली आहे. कराड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांची बदली उपविभागीय पोलिस अधिकारी वाई येथे करण्यात आली आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांची कराड शहर पोलीस ठाण्याला बदली झाली आहे. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांची कराड शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
पाटण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांची कराड शहर पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांची कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेत बदली करण्यात आली आहे. पाटण पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांची बदली कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा शाहूपुरी येथील पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला यांची कराड शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांची बदली कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पुजारी यांची बदली फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक म्हणून करण्यात आली आहे. कराड तालुका पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांची कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे.
कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा सातारा येथे करण्यात आली आहे. तर जिल्हा विशेष शाखा सातारा येथील पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांची कराड शहर पोलीस ठाण्यात नेमणूक केली आहे. मपोनी श्रीसुंदर रजनीकांत यांची सातारा नियंत्रण कक्षातून कराड शहर पोलीस ठाणे येथे नेमणूक करण्यात आली आहे.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment