देशात गेल्या 24 तासांत 514 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
सातारा जिल्ह्यात 4 कोरोना बाधित रूग्णांची वाढ..
कराड दि.11 (प्रतिनिधी) कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सध्या सर्वत्र चिंता वाढवली असली तरी नागरिकांनी घाबरू नये असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात 415 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये आज आलेल्या रिपोर्टमध्ये 4 बाधित रुग्णाची वाढ झाली. जिल्ह्यात सध्या 41 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण आहेत.
आज नमूने-चाचणी-415
आज बाधित वाढ- 4
आज कोरोनामुक्त-0
घरी उपचारार्थ रूग्ण-41
रूग्णालयात उपचार-0
----------------------------------------
देशात गेल्या 24 तासांत 514 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 4 हजार सक्रिय रुग्ण आहेत.महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत असून त्यामुळे चिंता वाढल्य़ा आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 250 रुग्ण आढळले आहेत.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment