आनंदाचं वाटप करणे हा आनंदी होण्याचा एकच मार्ग;प्रल्हाद पै...


आनंदाचं वाटप करणे हा आनंदी होण्याचा एकच मार्ग;प्रल्हाद पै...

कराड दि.8- आयुष्य जगत असताना आपण आपल्याकडे आनंद आहे हे हेच विसरून जातो. जीवन जगण्याची कला आपण शिकत नाही, गरज वाटत नाही. दुःखाचं वाटप क्षणाक्षणाला सुरू असतं. दुसऱ्याचे पाय खेचत पुढे ओढतात, मागे ओढण्यातच आपण वेळ व्यतीत करतो. आनंदाचं वाटप करणे हा आनंदी होण्याचा एकच मार्ग आहे, असा दिव्य संदेश सद्गुरु वामनराव पै यांचे चिरंजीव आणि जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांनी दिला.

सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम आयोजित भव्य विश्वप्रार्थना यज्ञ आणि 'आनंदाचे देणें 'या विषयावर ते बोलत होते. यावेळी स्टेडियमवर उपस्थित सुमारे 25000 हून अधिक लोकांनी विश्वाच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी 'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात ,आनंदात, ऐश्वर्यात ठेव .सर्वांचं भलं कर, कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे' ही सद्गुरु वामनराव पै रचित विश्वप्रार्थना म्हटली. कराड, सातारा, सांगली ,कोल्हापूर, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आणि मुंबईतील नामधारक तसेच खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी नगराध्यक्ष रोहीनी शिंदे, सौ सुमन सुरेश खाडे,भाजपाचे युवा नेते रामकृष्ण वेताळ, अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्यासहित मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रल्हाद पै यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना 'आनंदाने कसे जगावे आणि आनंद कसा वाटावा आणि सुखी कसं व्हावं,यावर सुमारे एक तास विस्तृत विवेचन केले. पै म्हणाले, आपल्याला जगण्यासाठी कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जगाची गरज असते. मध्यंतरी कोरोनाचे संकट आले तेव्हा जीव पणाला लावून लस तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रयत्न केले.‌ जीवन जगण्यासाठी आपणास सर्वाची किती गरज होती यावरून जगाला कळाले. आपल्या प्रत्येकावर समाजाचं ऋण आहे. हे ऋण आपण कसं फेडणार ? त्यासाठी आपण सुखी होऊन समाजालाही सुखी का केलं पाहिजे. सुख कसं मिळवायचं ते सद्गुरू शिकवतात.जे आहे ते द्यायचे आहे. तुम्ही आनंदस्वरुप आहात. तुम्ही आनंदीच आहात. पैशाने सुख मिळणार या गैरसमजजात पैशाच्या मागे लागलो आहे आणि त्यामुळेच आपण दुःखी आहोत. पैशाने सुख सोयी, वस्तू मिळतील पण आनंद नाही . अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा हवाच. हा पैसा कसा मिळवावा आणि खर्च कसा करावा हे जीवनविद्या शिकवते. मात्र केवळ पैशाच्या मागे लागलो तर सर्व काही मिळूनही शेवटी कळते 'हे ते नव्हेच' आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.

पै पुढे म्हणाले, सुख तुझ्या जवळ आहे . प्रत्येकात जी चैतन्य शक्ती नांदते हा आनंदच आहे. आनंद आपल्या कडे जाणीव रूपाने नांदतो. जे काही करतो, त्यातून आनंदाचेच वाटप करतो. दुःखाचं नव्हे आनंदाचे वाटप करा. आपण समोरच्या व्यक्तीचा मान राखला, कौतुक केलं,भान राखलं , लक्ष दिले किंवा कृतज्ञतापुर्वक राहिलो तरी आनंद देता.बोलण्यातून, चिंतनातून, कर्मातून , वागण्यातूनही आपण आनंद देऊ शकतो. आनंद दिला की जाणवायला लागेल. आनंद वाटप बुमरॅंग होऊन तुझ्या कडे येईल आणि तू आनंद लुटशील. दिल्याने मिळत आहे दिलाच पाहिजे. प्रेम द्या. दिलात की ऐश्वर्य वाढेल. देण्याची क्षमता देण्याने वाढते. देण्यामध्ये येण्याची ताकद आहे. देताना हात सैल सोडा. आहे त्यातल्या थोडा भाग द्या, असा दिव्य संदेश प्रल्हाद पै यांनी दिला.

विश्व प्रार्थना सुंदर विचारांची खाण आहे . आज सर्वत्र विचार प्रदुषण आहे . प्रार्थनेने विचार प्रदुषण कमी केलं आहे सद्गुरू वामनराव पै यांना वैचारिक क्रांती अपेक्षित आहे. जगात विश्रशाती नांदेल. आनंद देत देत जीवन बहरत जाईल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

सुत्रसंचलन विकास नाईक, आभार दिलिप महाजन यांनी मानले. कार्यक्रमास जीवन विद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, पंकज नाईक, संतोष तोत्रे, गिरिश सुकाळे, शितल गोरे, परशुराम राणे, बन्सीधर राणे, सुनील नेरूळकर, प्रशांत थारळी,भुषण गोसावी, विनोद मालुसरे,स्वप्निल पराडकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जीवन विद्या मिशन कराड, सातारा, सांगली, बेळगाव,जांभळी, वाई, कोरेगाव, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि पुणे शाखांचे सहकार्य लाभले.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक