Posts

Showing posts from July, 2022

राज्यात आज बी ए. 4 आणि 5 व्हेरीयंटचे 62 रुग्ण तर बीए.2.75 चे 79 रुग्ण आढळले....

Image
  कराड-येथिल कोविड स्मशानभूमित आज एका बाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले... सातारा जिल्ह्यात 34 बाधितांची वाढ ... कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 34 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 218 झाली असून सध्या 27 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 12 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-2,  खंडाळा- 0, खटाव- 3, कोरेगाव-5,  माण-4, महाबळेश्वर-0, पाटण-1, फलटण-3, सातारा-13, वाई-1, इतर 0 असे 34 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 506 (एकूण-26 लाख 6 हजार 817) आज बाधित वाढ- 34 (एकूण-2 लाख 80 हजार 14) आज कोरोनामुक्त- 10 (एकूण-2 लाख 73 हजार 34) आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 709) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-218 गंभीर रुग्ण--12 रूग्णालयात उपचार -27 ---------------------------------- महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-  1  हजार 849 आज कोरोनामुक्त- -1 हजार ...

कराड तालुक्यात चार आॅगस्ट रोजी सार्वजनिक सूट्टी जाहीर....

Image
कराड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुक क्षेत्रात मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर...   कराड दि.31-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त स्वच्छ व पारदर्शक वातावरणात होण्याच्या दृष्टीने तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कराड तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रात गूरूवार दि. 4 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी काही अटींच्या अधीन राहून जाहीर केली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर्स, माँल्स रिटेलर्स इ. या आस्थापनांमधील कामगारांना गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी खालील नमूद ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील, निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या,  निर्यात व्यवसायात असलेल्या क...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची दूसर्‍या दिवशी ही दिंडी.......

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची दूसर्‍या दिवशी ही विश्रांती.... कराड दि.31 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने सलग दूसर्‍या दिवशी विश्रांती घेतली  आहे. मात्र कराड शहरासह काही भागात काल ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाने चांगलीच हजेरी लावली.या पावसाने चांगलाच दणका दिला. जिल्ह्याच्या काही भागात मात्र पावसाने दडी मारली होती.काही ठिकाणी ऊन पडले होते तर काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या हलख्या सरी कोसळत होत्या. काल व आज सकाळी आठपर्यंत कोयना येथे 0 मि.मि, पावसाची नोंद झाली आहे.तर नवजा येथे केवळ 1 मि.मि.पाऊस पडला आहे. गेल्या चोविस तासात धरणात केवळ 0.07 टीएमसी पाणीसाठा वाढला असुन धरणातील वाढ संथगतीने होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 40.1 टीएमसी पाण्याची गरज आहे. काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, प्रकल्प क्षेत्रात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. कोयना नवजा परिसरात फक्त 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 0 मि.मी तर नवजा येथे 1 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 8 मिलिमीटर पाऊस नोंदला गे...

गेल्या चोविस तासात देशात व राज्यात बाधितांची मोठी वाढ;सातारा जिल्ह्यात रूग्णवाढ स्थिर....

Image
  सातारा जिल्ह्यात 35 बाधितांची वाढ ... कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 35 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 198 झाली असून सध्या 27 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 3 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-4,  खंडाळा- 3, खटाव- 5, कोरेगाव-7,  माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-2, फलटण-3, सातारा-9, वाई-0, इतर 0 असे 35 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 617 (एकूण-26 लाख 6 हजार 311) आज बाधित वाढ- 35 (एकूण-2 लाख 79 हजार 980) आज कोरोनामुक्त- 20 (एकूण-2 लाख 73 हजार 24) आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 709) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-198 गंभीर रुग्ण--3 रूग्णालयात उपचार -27 ---------------------------------- महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-  2  हजार 87 आज कोरोनामुक्त- -2 हजार 259 आज मृत्यू- 4 सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 10 -----------------------------...

राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आहे - उद्धव ठाकरे...

Image
  मुंबई, दि. 30 -- "मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच विरोधक राज्यपालांवर टीका करत असून, राज्यापालांनी माफी मागावी, अशी मागणी करत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणेही होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय म्हणाले? राज्यपालांच्या विधानाशी आपण सहमत नाही, मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई या देशाची आर्थिक राजधानी बनली आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं तर उपम...

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप;कोयना महाबळेश्वरात पावसाची विश्रांती......

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती.... कराड दि.30 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पून्हा उघडीप दिली आहे. मात्र जावली, वाई तालुक्यात ढगफूटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला.अनेक ठिकाणी दोन दिवस पावसाने चांगलाच दणका दिला.अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते जलमय झाले होते.जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाने दडी मारल्याने श्रावणाच्या सरी ही कोसळल्या नाहीत.काही ठिकाणी ऊन पडले होते तर काही ठिकाणी अधून मधून पावसाची सर येत होती. काल पासून कोयना महाबळेश्वर येथे 0 मि.मि, पावसाची नोंद झाली आहे.तर अन्य काही गात श्रावण सरी सुरू झाल्या आहेत. धरणात येणारी आवक कमी झाली आहे. पायथा गृहातून विसर्ग बंदच आहे. गेल्या चोविस तासात धरणात केवळ 0.15 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.सध्या सूरू असलेल्या रिपरिप पावसाने धरणातील वाढ संथगतीने होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 40.33 टीएमसी पाण्याची गरज आहे. काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, प्रकल्प क्षेत्रात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. कोयना नवजा परिसरात फक्त 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर...

राज्यात बीए. 5 चे चार नवे रुग्ण व बीए. 2.75 चे 32 रुग्ण....

Image
  सातारा जिल्ह्यात 38 बाधितांची वाढ ... कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 38 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 193 झाली असून सध्या 30 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 8 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-4,  खंडाळा- 4, खटाव- 7, कोरेगाव-0,  माण-0, महाबळेश्वर-1, पाटण-3, फलटण-3, सातारा-11, वाई-2, इतर 0 असे 38 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 642 (एकूण-26 लाख 5 हजार 694) आज बाधित वाढ- 38 (एकूण-2 लाख 79 हजार 945) आज कोरोनामुक्त- 27 (एकूण-2 लाख 73 हजार 04) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 708) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-193 गंभीर रुग्ण--8 रूग्णालयात उपचार -30 ---------------------------------- महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-  1  हजार 997 आज कोरोनामुक्त-2 हजार 470 आज मृत्यू- 6 सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 186 ----------------------------...

आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.....

Image
  नडशी येथे वृक्षारोपन आणि शालेय साहित्‍यांचे वाटप करून आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा.... कराड दि.29-नडशी ता.कराड येथे ग्रामस्‍थ व ग्रामपंचायत नडशी यांच्यावतीने सह्याद्री कारखान्याचे चेअरमन, कराड उत्‍तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त वृक्षारोपन करण्यात आले.तसेच अंगणवाडी व जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्‍यांना वह्या पेन आदि शालेय साहित्‍यांसह खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी केक कापून आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या संचालिका सौ.शारदाताई मंगेश पाटील, सरपंच गोविंदराव थोरात, उपसरपंच बळवंत नलवडे, माजी उपसरपंच शंकरराव पाटील, विलासराव थोरात, भगवान थोरात, पांडुरंग थोरात (आबा), माणिकराव थोरात, नडशी वि.का.स.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गणेश नलवडे, सदस्‍य विश्वास थोरात, ग्रा.पं.सदस्‍य शामराव रविढोणे, सदस्‍या सौ आशालता थोरात, तंटामुक्‍त गांव समितीचे अध्यक्ष शंकर थोरात, युवा उद्योजक निवासराव पाटील, भरत थोरात, गणेश थोरात, हरिष कदम, मंगेश पाटील, शंकर कदम, उत्तमराव थोरात, प्रा.आनंदराव थोरात, कृष्‍णत थोरात, राजेंद्र किसन थोरात, संज...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी....

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी.... कराड दि.29 (प्रतिनिधी) जिल्ह्यात व कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने काल उघडीप दिली होती. मात्र सायंकाळी-रात्री पावसाने पून्हा हजेरी लावल्याने धरणात येणारी आवक वाढली आहे. मात्र पायथा गृहातून विसर्ग बंदच आहे.गेल्या चोविस तासात धरणात केवळ 0.29 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.सध्या सूरू असलेल्या पावसाने धरणातील वाढ संथगतीने होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 40 टीएमसी पाण्याची गरज आहे. काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, प्रकल्प क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. कोयना नवजा परिसरात 46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 36 मि.मी तर नवजा येथे 10 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 3 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 24 % टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या कोयना धरणात 64.77 टीएमसी पाणीसाठा असून धरण 61.56 % टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.29 टीएमसी पाणीसाठा धरणात वाढला आहे. धरणातील आवक ही वाढली झाली असून सध्या 3 हजार 410 क्युसेक आवक स...

नांदलापूर 'वृध्दाश्रम' येथे कु.गायत्री शिर्के हिचा वाढदिवस साजरा...

Image
  नांदलापूर 'वृध्दाश्रम' येथे कु.गायत्री शिर्के हिचा वाढदिवस साजरा... कराड दि.28- कराड येथून पुणे-बेंगलोर हायवेला साधारण चार किलोमीटर अंतरावर असलेले नांदलापूर येथील शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन संचलित 'वृद्धाश्रम' या ठिकाणी वृद्ध निराधार वास्तव्यस आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या धडपडीतून साकारलेले हे आश्रम वृद्ध निराधारांसाठी एक ममतेचे घरकुलच बनले आहे. लोकांच्या सहभागातून आता त्यास मदत ही मिळू लागली आहे. कराड येथील कुमारी गायत्री प्रकाश शिर्के या मुलीचा वाढदिवस साजरा करून तिच्या कुटुंबाने वृद्ध निराधारांच्या समवेत आनंद साजरा केला. त्यावेळी वडील प्रकाश सदाशिव शिर्के, विश्वास आण्णा निकम, जयवंत शिर्के, संतोष शहा, शशिकांत कसबे,सई ढगे हे आवर्जून उपस्थित राहून तेथे आनंदाचे वातावरण निर्माण करून आश्रमातील वृद्ध निराधार यांना आपलेपणाची जाणीव करून दिली. यावेळी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनचे पदाधिकारी विकासभाऊ सूर्यवंशी, व्याख्याते सी डी पवार, कवी सत्यवान मंडलिक, शीतलकुमार अर्धावर, स्वाधिन शाह यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काही अंशी स्थिर; देशात 44 कोरोना बाधितांचा मृत्यू....

Image
  सातारा जिल्ह्यात 44 बाधितांची वाढ ... कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 44 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 183 झाली असून सध्या 36 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 10 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-6,  खंडाळा- 1, खटाव- 7, कोरेगाव-10,  माण-2, महाबळेश्वर-0, पाटण-5, फलटण-2, सातारा-8, वाई-1, इतर 0 असे 44 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 649 (एकूण-26 लाख 5 हजार 52) आज बाधित वाढ- 44 (एकूण-2 लाख 79 हजार 907) आज कोरोनामुक्त- 60 (एकूण-2 लाख 72 हजार 977) आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 708) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-183 गंभीर रुग्ण--10 रूग्णालयात उपचार -36 महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-   2 हजार 203 आज कोरोनामुक्त-2 हजार 478 आज मृत्यू- 3 सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 665 देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ- 20 हजार 557...

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; 'त्या' जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच.....

Image
  सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का; 'त्या' जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच..... ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर होण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. दिल्ली दि.28-सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना केली, असे समजण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.  बांठिया आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हेआरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बॅक...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप;धरणातून विसर्ग बंद........

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप.... कराड दि.28 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे.धरणात येणारी आवक कमी झाल्याने पायथा गृहातून विसर्ग बंद करण्यात आला आहे.गेल्या चोविस तासात धरणात केवळ 0.22 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.जूलै महिन्यात तूलनेने पावसाची कमी नोंद झाली आहे.सध्या सूरू असलेल्या पावसाने धरणातील वाढ संथगतीने होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 40 टीएमसी पाण्याची गरज असून आॅगस्टमध्ये श्रावणातील पावसाच्या सरीने तरी धरण भरेल  का हे पाहावे लागेल. काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गत महिनाभरातील पावसाची ही सर्वात कमी नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 1 मि.मी तर नवजा येथे 3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 5 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 22 % टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या कोयना धरणात 64.36 टीएमसी पाणीसाठा असून धरण 61.26 % टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.22 टीएमसी पाणीसाठा धरणात झाला आहे. धरणातील आवक ही कमी झाली असून सध्या 2 हजार 557 क्यु...

विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून नांदलापूर वृध्दाश्रमास सहकार्य...

Image
विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून नांदलापूर वृध्दाश्रमास सहकार्य... कराड दि.27- सोंग- ढोंग, सत्य- सत्याची पारख जगाला कळते. सत्य हे सूर्यप्रकाशाइतके तेजस्वी आणि स्वच्छ असते. असेच कराड तालुक्यातील शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित 'वृद्धाश्रम' नांदलापूर तालुका कराड जे फक्त आणि फक्त लोकसहभागातून चालू आहे. येथील खर्चाचा ताण कमी होऊन हे वृद्धाश्रम आकार घेत आहे. जणू अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत शंभूरत्न परिवर्तनाच्या पदाधिकाऱ्यांनी या कामास स्वतःस झोकून दिले आहे. त्यास आता हळूहळू रुप येताना दिसत आहे. कराड येथील जी. डी. माने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र माने साहेब, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वास निकम, पोस्ट कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शिर्के, महसूल विभागाचे अरविंद वास्के, किसान इंडिया फोर्स कंपनीचे मॅनेजर संतोष शहा, सुख शांती वाचनालयाचे संचालक प्रकाश शिर्के, आटके येथील जाधव मिस्त्री यांनी नंदापूरच्या वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील वृद्ध व निराधार यांच्या खाण्यापिण्याची काळजी म्हणून धान्य,किराणा देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व समा...