सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप;कोयना महाबळेश्वरात पावसाची विश्रांती......
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती....
कराड दि.30 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पून्हा उघडीप दिली आहे. मात्र जावली, वाई तालुक्यात ढगफूटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला.अनेक ठिकाणी दोन दिवस पावसाने चांगलाच दणका दिला.अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते जलमय झाले होते.जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाने दडी मारल्याने श्रावणाच्या सरी ही कोसळल्या नाहीत.काही ठिकाणी ऊन पडले होते तर काही ठिकाणी अधून मधून पावसाची सर येत होती.
काल पासून कोयना महाबळेश्वर येथे 0 मि.मि, पावसाची नोंद झाली आहे.तर अन्य काही गात श्रावण सरी सुरू झाल्या आहेत. धरणात येणारी आवक कमी झाली आहे. पायथा गृहातून विसर्ग बंदच आहे. गेल्या चोविस तासात धरणात केवळ 0.15 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.सध्या सूरू असलेल्या रिपरिप पावसाने धरणातील वाढ संथगतीने होत आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 40.33 टीएमसी पाण्याची गरज आहे.
काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, प्रकल्प क्षेत्रात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. कोयना नवजा परिसरात फक्त 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 0 मि.मी तर नवजा येथे 2 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 0 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 22.96 % टक्के पाणीसाठा कमी आहे.
सध्या कोयना धरणात 64.92 टीएमसी पाणीसाठा असून धरण 61.68 % टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.15 टीएमसी पाणीसाठा धरणात वाढला आहे. धरणातील आवक ही वाढली झाली असून सध्या 1 हजार 705 क्युसेक आवक सुरू आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 89.08 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 84.64% भरले होते
Comments
Post a Comment