राज्यात आज बी ए. 4 आणि 5 व्हेरीयंटचे 62 रुग्ण तर बीए.2.75 चे 79 रुग्ण आढळले....

 

कराड-येथिल कोविड स्मशानभूमित आज एका बाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
सातारा जिल्ह्यात 34 बाधितांची वाढ ...

कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 34 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 218 झाली असून सध्या 27 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 12 गंभीर रुग्णाचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0, कराड-2, खंडाळा- 0, खटाव- 3, कोरेगाव-5,  माण-4, महाबळेश्वर-0, पाटण-1, फलटण-3, सातारा-13, वाई-1, इतर 0 असे 34 बाधितांची वाढ झाली आहे.

नमूने-चाचणी- 506 (एकूण-26 लाख 6 हजार 817)

आज बाधित वाढ- 34 (एकूण-2 लाख 80 हजार 14)

आज कोरोनामुक्त- 10 (एकूण-2 लाख 73 हजार 34)

आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 709)

सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-218

गंभीर रुग्ण--12

रूग्णालयात उपचार -27

----------------------------------

महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ-  1 हजार 849

आज कोरोनामुक्त- -1 हजार 853

आज मृत्यू- 3

सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 3

-----------------------------------------

देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ-  19 हजार 673

आज कोरोनामुक्त-  19 हजार 336

आज मृत्यू- 39

सध्या उपचारार्थ रूग्ण- 1 लाख 43 हजार 676

-----------------------------------

कोविड लस अमृत महोत्सव...

केंद्र सरकारकडून ''कोविड लस अमृत महोत्सव'' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे.सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत लस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांना हा बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी "कोविड लस अमृत महोत्सव" राबवण्यात येणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, हा त्यामागील मुख्य हेतू असून या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.कराडमध्ये टाऊन हाॅल येथे तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सूरू आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक