आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.....
नडशी येथे वृक्षारोपन आणि शालेय साहित्यांचे वाटप करून आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा....
कराड दि.29-नडशी ता.कराड येथे ग्रामस्थ व ग्रामपंचायत नडशी यांच्यावतीने सह्याद्री कारखान्याचे चेअरमन, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले.तसेच अंगणवाडी व जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन आदि शालेय साहित्यांसह खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी केक कापून आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याच्या संचालिका सौ.शारदाताई मंगेश पाटील, सरपंच गोविंदराव थोरात, उपसरपंच बळवंत नलवडे, माजी उपसरपंच शंकरराव पाटील, विलासराव थोरात, भगवान थोरात, पांडुरंग थोरात (आबा), माणिकराव थोरात, नडशी वि.का.स.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गणेश नलवडे, सदस्य विश्वास थोरात, ग्रा.पं.सदस्य शामराव रविढोणे, सदस्या सौ आशालता थोरात, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष शंकर थोरात, युवा उद्योजक निवासराव पाटील, भरत थोरात, गणेश थोरात, हरिष कदम, मंगेश पाटील, शंकर कदम, उत्तमराव थोरात, प्रा.आनंदराव थोरात, कृष्णत थोरात, राजेंद्र किसन थोरात, संजय थोरात, पांडुरंग कदम, किसन पिसाळ, मारूती पाटील, राजेंद्र नलवडे, शिवाजी थोरात, संजय सावकर, विठ्ठल थोरात, अमोल थोरात, रामदास थोरात, मारूती सकट, बंडा गुरव, राजेंद्र गुरव यांचेसह युवा कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्ले येथे आ.बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
पार्ले ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना आंबा रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यानगर येथील सर्व महाविद्यालयांना, स्व.यशवंतरावजी चव्हाण यांनी लिहिलेले ‘सह्याद्रिचे वारे’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.यावेळी केक कापून आ. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गावात केक कापून वाढदिवस साजरा करताना सह्याद्रि कारखान्याचे माजी संचालक अशोकराव पाटील-पार्लेकर, पार्ले-बनवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विकास पाटील, व्हाईस चेअरमन मंदाकिनी नलवडे, सोसायटीचे सदस्य भगवानराव पाटील, संभाजी नलवडे, प्रकाश नलवडे, पंडीत नलवडे, शिवाजी नलवडे, रमेश मिसाळ, दिलीप मदने, संपतराव माळी, रामभाऊ साठे, यांचेसह प्रकाशकाका पाटील, तानाजी बापू नलवडे, संभाजी नलवडे, संपतराव नलवडे, बाळासो नलवडे, भाऊसाहेब घाडगे, भिकू विष्णू नलवडे, नागेश मिसाळ, सोमनाथ नलवडे, सचिव संभाजी नलवडे, शशिकांत वदक सातारा जि.म.बँक शाखा सैदापूरचे विकास अधिकारी व पार्ले गांवचे ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments
Post a Comment