विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून नांदलापूर वृध्दाश्रमास सहकार्य...
विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून नांदलापूर वृध्दाश्रमास सहकार्य...
कराड दि.27- सोंग- ढोंग, सत्य- सत्याची पारख जगाला कळते. सत्य हे सूर्यप्रकाशाइतके तेजस्वी आणि स्वच्छ असते. असेच कराड तालुक्यातील शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित 'वृद्धाश्रम' नांदलापूर तालुका कराड जे फक्त आणि फक्त लोकसहभागातून चालू आहे. येथील खर्चाचा ताण कमी होऊन हे वृद्धाश्रम आकार घेत आहे. जणू अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत शंभूरत्न परिवर्तनाच्या पदाधिकाऱ्यांनी या कामास स्वतःस झोकून दिले आहे. त्यास आता हळूहळू रुप येताना दिसत आहे.
कराड येथील जी. डी. माने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र माने साहेब, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वास निकम, पोस्ट कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शिर्के, महसूल विभागाचे अरविंद वास्के, किसान इंडिया फोर्स कंपनीचे मॅनेजर संतोष शहा, सुख शांती वाचनालयाचे संचालक प्रकाश शिर्के, आटके येथील जाधव मिस्त्री यांनी नंदापूरच्या वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील वृद्ध व निराधार यांच्या खाण्यापिण्याची काळजी म्हणून धान्य,किराणा देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व समाजास एक प्रेरणा दिली आहे.
यावेळी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनचे विकासभाऊ सुर्यवंशी, व्याख्याते सी डी पवार, कवी मंडलिक, शितलकुमार अर्धावर, स्वाधीन शाह यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
Comments
Post a Comment