राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काही अंशी स्थिर; देशात 44 कोरोना बाधितांचा मृत्यू....

 


सातारा जिल्ह्यात 44 बाधितांची वाढ ...

कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 44 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 183 झाली असून सध्या 36 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 10 गंभीर रुग्णाचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0, कराड-6, खंडाळा- 1, खटाव- 7, कोरेगाव-10,  माण-2, महाबळेश्वर-0, पाटण-5, फलटण-2, सातारा-8, वाई-1, इतर 0 असे 44 बाधितांची वाढ झाली आहे.

नमूने-चाचणी- 649 (एकूण-26 लाख 5 हजार 52)

आज बाधित वाढ- 44 (एकूण-2 लाख 79 हजार 907)

आज कोरोनामुक्त- 60 (एकूण-2 लाख 72 हजार 977)

आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 708)

सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-183

गंभीर रुग्ण--10

रूग्णालयात उपचार -36


महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ-  2 हजार 203

आज कोरोनामुक्त-2 हजार 478

आज मृत्यू- 3

सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 665



देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....

आज बाधित वाढ- 20 हजार 557

आज कोरोनामुक्त-  19 हजार 216

आज मृत्यू- 44

सध्या उपचारार्थ रूग्ण- 1 लाख 46 हजार 323



मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढली...

जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्सची लागण होण्यामागे आता आणखी एक कारण उघड झालंय. समलैंगिक संबंध असणाऱ्या आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका अधिक आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव टाळण्याकरता एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबतचे लैंगिक संबंध टाळा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. भारतात सध्या मंकीपॉक्सचे चार रुग्ण आहेत आहेत. यांपैकी तीन केरळमधील असून एक रुग्ण दिल्लीतील आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

सामान्यत: ताप, डोकेदुखी, तीन आठवड्यांपर्यंत पुरळ, घसा खवखवणे, खोकला आणि फोड ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. फोड साधारणपणे ताप आल्‍यानंतर एक ते तीन दिवसांच्‍या आत सुरू होतात, सुमारे दोन ते चार आठवडे टिकतात आणि उपचार सुरू राहेपर्यंत अनेकदा वेदनादायक असतात. त्यांना खाजही येते. मंकीपॉक्स विषाणूचा तळवे आणि तळवे यांच्यावर विशेष प्रभाव पडतो.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक