Posts

शताब्दी महोत्सव;'इये मराठीचिये नगरी' या रंगमंचीय आविष्कारास श्रोत्यांची दाद...

Image
  शताब्दी महोत्सव;'इये मराठीचिये नगरी' या रंगमंचीय आविष्कारास श्रोत्यांची दाद... कराड दि.19-संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्रकलेचे रंग उधळणारा 'इये मराठीचीये नगरी' या रंगमंचीय आविष्कारात एस.एम.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतीने शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात दाद मिळवली. सुमारे 80 हून अधिक विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती, चालीरीती, परंपरेचे दर्शन घडविले. संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन अभिजित कुलकर्णी, नृत्य दिग्दर्शन अदिती जोशी, भारती सुतार तर गायनाचे मार्गदर्शन शाळेतील संगीत शिक्षिका योगिता जोशी यांचे होते.  महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा, येथील पद्धती, परंपरा आणि त्याचे समकालीन संदर्भ यांचा धागा जोडून तयार झालेला रंगमंचीय आविष्कार लघुनाट्य, एकपात्री, द्विपात्री प्रयोग, काव्यवाचन आणि निवेदनातून अधिकाधिक खुलत गेला. कुसुमाग्रज, शांता शेळके, संजीवनी बोकील, बा.भ. बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. सलाम, नगं तोडू माजी शाळा यासारख्या कविता रसिकांची दाद मिळवून ...

'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव'या ऐतिहासिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली...

Image
  'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव'या  ऐतिहासिक  सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली... कराड दि.19-देशाच्या पारतंत्र्यापासून, देशस्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवापर्यंतच्या विविध ऐतिहासिक घडामोडींचा मागोवा घेणा-या व ओगलेवाडीच्या आत्माराम विद्यामंदिरच्या बालमावळयांनी सादर केलेला 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक ऐतिहासिक क्षणांचे भरल्या मनाने साक्षीदार झाले. निमित्त होते शिक्षण मंडळ संस्थेचा व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभातील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमाचे. संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर आत्माराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा तारु, पर्यवेक्षक एस जे सूर्यवंशी, सांस्कृतिक विभागप्रमुख आर टी भालेराव विद्यार्थी शिक्षक पालक यांची यावेळी उपस्थिती होती. या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात भारत पारतंत्र्याच्या काळाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीसच इंग्रजांचे देशात व्यापारी म्हणून आगमन व पुढे सत्ता काबीज करण्याचे षडयंत्र दाखविण्यात आले. या जुलमी इंग्रज सत्तेला उलथू...

शताब्दी महोत्सव;'देश रंगीला' सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद...

Image
  शताब्दी महोत्सव;'देश रंगीला' सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद... कराड दि.18-देशाच्या विविध राज्यांतील लोककला परंपरा व संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष रंगमंचावर होताच प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सांस्कृतिक लोकधारेच्या परंपरेचा नजराणा व अनमोल ठेवा नृत्याच्या रूपाने साकारताना टिळक हायस्कूलच्या स्थापने वेळचे 11 देशभक्त व 100 वर्षातील बारा मुख्याध्यापक स्टेजवर येताच गत वैभवातील इतिहासात उपस्थित माजी विद्यार्थी रंगून गेले आणि गहिवरले सुद्धा! निमित्त होते टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित 'देश रंगीला' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. शताब्दी महोत्सव विशेष कार्यक्रमांतर्गत टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित देश रंगीला कार्यक्रमाने शताब्दी महोत्सवाची उंची वाढवली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, डॉ. चितळे, डॉ. मीनाताई पेंढारकर, मुख्याध्यापक जी जी अहिरे, उपप्राचार्य धनाजी देसाई, पर्य...

राज्यातील पालिका, महापालिका निवडणूका लांबणार...

Image
  राज्यातील पालिका,महापालिका निवडणूका लांबणार... मुंबई दि.18-राज्यातल्या पालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थां संदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.याबाबतचे प्रकरण काल लिस्ट मध्ये होते पण सुनावणी झाली नव्हती. आज प्रकरण मेन्शन मात्र त्यानंतर नवी तारीख देण्यात आली.त्यामुळे आता सूनावणी निकाल व त्यानंतर निवडणूकांच्या तारखा जाहिर होणार आहेत. दरम्यान याबाबतच्या सूनावण्या लांबणीवर पडल्यातर राज्यातील निवडणूकांच्या तारखा ही पूढे जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात पुढची सुनावणी झाली व त्यात निकाल लागला तर पूढे मार्च व एप्रिल महिन्यात शालेय परिक्षा, मे महिन्यात प्रभागरचना आरक्षण सोडत झाली तर निवडणूका नाही तर जुन-सप्टेंबर महिन्यात पावसाळा असणार आहे.एकूणच न्यायालयातील सूनावणी व निकाल यावर निवडणूकांच्या तारखा आवलंबून असणार आहेत. राज्यातील विधानसभेतील दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा निवडणुकांच्या जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे...

कराड नगरपरिषदेचे अभियंता आर डी भालदार यांचा राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मान...

Image
कराड नगरपरिषदेचे  आरोग्य  अभियंता आर डी भालदार यांचा राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मान... कराड दि.18-महात्मा ज्योतिबा फूले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या स्मृतीदिनाचे औचत्य साधून येथिल परिर्वतन प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने (State Level Iddel Engineer Award) कराड नगरपरिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार  (Health Engineer RD Bhaldar) (रफिक दस्तगीर भालदार) यांना मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले. येथे झालेल्या कार्यक्रमात तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार बी एम गायकवाड, विजय माने, उद्योजक सलिम मूजावर व संस्थेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान करण्यात आला. अभियंता रफिक दस्तगीर भालदार हे कराड नगरपरिषद (Karad Municipal Council) मध्ये १९८५ साला पासून अभियंता या पदावर कार्यरत आहे. या सेवेच्या कालावधी मध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या सर्व विभागामध्ये कामे करून शासनाच्या सर्व शासकीय योजनाची प्रभावीपणे अमंलबजावणी केलेली आहे. हा त्यांचा असलेला प्रदिर्घ अनुभव पाहून नगरपरिषदेने त्यांना सध्या सुरू असले...

येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन; आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप...

Image
  येवती : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा. बाजूस डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, प्रमोद जठार, सुनील पाटील, पैलवान धनंजय पाटील व अन्य मान्यवर. मोदींनी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणले : ना. अजयकुमार मिश्रा... येवती येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन; आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप... कराड दि.17 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय्य ठेऊन जनतेसाठी जलजीवन मिशन, हर घर नल, आयुष्यमान भारत योजना, खाद्यान्न योजना, मोफत लसीकरण अशा अनेक योजना सुरू केल्या. या लोकोपयोगी योजनांमुळे गेल्या ८ वर्षात मोदींनी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले. जलजीवन मिशन अंतर्गत येवती (ता. कराड) येथे सुरु करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या ना. मिश्रा यांचे कराड दक्षिण मतदारसंघात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या प...

कराडच्या अवाजवी पाणीपट्टी विरोधात नागरिकांची नगरपालिकेत धाव;विविध संघटनेच्यावतीने निवेदन...

Image
कराडच्या अवाजवी पाणीपट्टी विरोधात नागरिकांची नगरपालिकेत धाव;विविध संघटनेच्यावतीने निवेदन... कराड दि.17- (प्रतिनिधी) कराड नगरपरिषद कडून 24 तास पाणी योजनेअंतर्गत शहरातील नागरिकाकडून शुल्क घेऊन पाण्याचे मीटर बसवण्यात आली आहेत. मात्र 24 तास योजना अद्याप चालू झालेली नाही. योजना सुरू होण्यापूर्वी सुरू असलेला पाणीपुरवठा त्यातही मंगळवार व शनिवार एकच वेळ पाणी येत होते त्याच पद्धतीचा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. मात्र तरीही नगरपालिकेने एप्रिल 2022 पासून मीटर प्रमाणे पाणीपट्टी आकारणी सुरू केलेली आहे. ही आकारणी गैरवाजवी व सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज कराड शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना निवेदन दिले. कराड नगर परिषदेकडून अध्याप ही 24 तास योजना पूर्णपणे कार्यान्वित नसताना पूर्वी ज्या पद्धतीने पाणीपुरवठा होत होता त्याच पद्धतीने तो केला जात आहे. त्यामुळे पूर्वीचा दोन वेळचा पाणीपुरवठा हा मीटर प्रमाणे बिल आकारणी न करता वार्षिक बिलाप्रमाणेच आकारणी करावी अशी ही मागणी नागरिकांतून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मीटर प्रमाणे पा...