कराड नगरपरिषदेचे अभियंता आर डी भालदार यांचा राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मान...
कराड नगरपरिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार यांचा राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मान...
कराड दि.18-महात्मा ज्योतिबा फूले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या स्मृतीदिनाचे औचत्य साधून येथिल परिर्वतन प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्काराने (State Level Iddel Engineer Award) कराड नगरपरिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार (Health Engineer RD Bhaldar) (रफिक दस्तगीर भालदार) यांना मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले. येथे झालेल्या कार्यक्रमात तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार बी एम गायकवाड, विजय माने, उद्योजक सलिम मूजावर व संस्थेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान करण्यात आला.
अभियंता रफिक दस्तगीर भालदार हे कराड नगरपरिषद (Karad Municipal Council) मध्ये १९८५ साला पासून अभियंता या पदावर कार्यरत आहे. या सेवेच्या कालावधी मध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या सर्व विभागामध्ये कामे करून शासनाच्या सर्व शासकीय योजनाची प्रभावीपणे अमंलबजावणी केलेली आहे. हा त्यांचा असलेला प्रदिर्घ अनुभव पाहून नगरपरिषदेने त्यांना सध्या सुरू असलेल्या देशपातळीवरील स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान, राज्य पातळीवरील माझी वसुंधरा अभियान ((Majhi Vasundhara Abhiyana) अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.
अभियंता भालदार (Health Engineer RD Bhaldar) यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून सन २०१८-२०२२ पर्यंत कराड नगरपरिषेदस स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये देश पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये व माझी वसुंधरा अभियान मध्ये प्रथम क्रमांक अव्वल स्थान राखणे शक्य झाले आहे. या सर्व कामाची पोचपावती म्हणून परिर्वतन प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अभियंता म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल याआधी ही अनेक संस्था, संघटनानी घेऊन त्यांचा गौरव केला आहे.त्यांच्या या सन्मानाचे सर्व स्थरांतून कौतूक व अभिनंदन केलं जात आहे.

Comments
Post a Comment