'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव'या ऐतिहासिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली...

 


'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव'या ऐतिहासिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली...

कराड दि.19-देशाच्या पारतंत्र्यापासून, देशस्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवापर्यंतच्या विविध ऐतिहासिक घडामोडींचा मागोवा घेणा-या व ओगलेवाडीच्या आत्माराम विद्यामंदिरच्या बालमावळयांनी सादर केलेला 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक ऐतिहासिक क्षणांचे भरल्या मनाने साक्षीदार झाले. निमित्त होते शिक्षण मंडळ संस्थेचा व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभातील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमाचे. संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र लाटकर आत्माराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा तारु, पर्यवेक्षक एस जे सूर्यवंशी, सांस्कृतिक विभागप्रमुख आर टी भालेराव विद्यार्थी शिक्षक पालक यांची यावेळी उपस्थिती होती.

या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात भारत पारतंत्र्याच्या काळाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीसच इंग्रजांचे देशात व्यापारी म्हणून आगमन व पुढे सत्ता काबीज करण्याचे षडयंत्र दाखविण्यात आले. या जुलमी इंग्रज सत्तेला उलथून टाकण्यासाठी भारतीय देशभक्तानी केलेला स्वातंत्र्याचा एल्गार व सायमन गो बॅकची दिलेली हाक यामुळे स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये भारतीय देशभक्तांचे योगदान पाहावयास मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाप्रती झपाटलेले देशभक्त स्वतःच्या मरणापेक्षाही देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे विद्याथ्र्यांनी अत्यंत करारी व जिगरबाजपणे प्रदर्षित केले. 

या ऐतिहासिक कार्यक्रमात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी, बहादूरशहा जफर, वासूदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, भगतसिंग, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरु आदी स्वातंत्र्याप्रती झटणा-या देशभक्तांची हुबेहूब पात्रे पाहायला मिळाली.तसेच देशभक्तीचे उधान आणणारे गर्जा जयजयकार, उठा राष्ट्रवीर हो, वेदमंत्राहून आम्हा, मेरा कर्मा तू, तवस्मरण, गणेश आगमन, राजे शिवछत्रपती जयजयकार, कर चले हम फिदा, उंच उंच गगनात, बलसागर भारत होवो, इत्यादी देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची उंची वाढवली.

या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आर टी भालेराव, यांनी मार्गदर्शन केले. एम एस कुंभार यांनी नेपथ्य, डी डी चव्हाण यांनी रंगभूशा केली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिक्षक यांनी परीश्रम घेतले

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक