शताब्दी महोत्सव;'देश रंगीला' सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद...
शताब्दी महोत्सव;'देश रंगीला' सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद...
कराड दि.18-देशाच्या विविध राज्यांतील लोककला परंपरा व संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष रंगमंचावर होताच प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सांस्कृतिक लोकधारेच्या परंपरेचा नजराणा व अनमोल ठेवा नृत्याच्या रूपाने साकारताना टिळक हायस्कूलच्या स्थापने वेळचे 11 देशभक्त व 100 वर्षातील बारा मुख्याध्यापक स्टेजवर येताच गत वैभवातील इतिहासात उपस्थित माजी विद्यार्थी रंगून गेले आणि गहिवरले सुद्धा!
निमित्त होते टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित 'देश रंगीला' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. शताब्दी महोत्सव विशेष कार्यक्रमांतर्गत टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित देश रंगीला कार्यक्रमाने शताब्दी महोत्सवाची उंची वाढवली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, डॉ. चितळे, डॉ. मीनाताई पेंढारकर, मुख्याध्यापक जी जी अहिरे, उपप्राचार्य धनाजी देसाई, पर्यवेक्षक राजेश धुळूगडे, उपमुख्याध्यापक के पी वाघमारे, पर्यवेक्षक एस यु बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
देश रंगीला या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक ऑगस्ट 1920 रोजी टिळकांच्या निधनानंतर कराडला शोकसभा आयोजित करण्यात आली होती . या शोकसभेच्या 11 देशभक्त नागरिकांनी टिळकांच्या स्मृती अखंड जपण्यासाठी टिळक हायस्कूलची स्थापना केली. त्या अकरा देशभक्तांच्या जुन्या पोशाखातील व्यक्तिमत्त्वांचे रंगमंचावर आगमन झाले. तेव्हा उपस्थित समुदायाने टाळ्यांच्या गजरात उभे राहून स्वागत केले . 100 वर्षांपूर्वीचा टिळक हायस्कूलच्या स्थापनेचा इतिहास उपस्थित जणांच्या हृदयात घर करून गेला.
टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला देश रंगीला हा कार्यक्रम. लोक परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्याऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित जणांनी दाद दिली. यावेळी भारत मातेचा पोवाडा, उत्तराखंडचे नमो नमो, कश्मीरचे बुमरो बुमरो, पंजाबचे भांगडा नृत्य, राजस्थानचे घूमर कटपुतली नृत्य, आसामचे बिहू नृत्य, मिझोरामचे आदिवासी नृत्य, गुजरातचे गरबा नृत्य, महाराष्ट्राचे गोंधळ आणि पंढरीची वारी, भारुड सादर करण्यात आले. या देश रंगीला कार्यक्रमात टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षिका व प्राध्यापिकांनी भारतीय लोक परंपरेचे दर्शन घडविणारी नृत्ये सादर केली.
यामध्ये टिळक हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक पाठक सरांच्या भूमिकेत रोहित पाटील, दुवेदी सर यांच्या भूमिकेत यश चव्हाण, कोल्हापुरे सर अनिरुद्ध जोशी, हरोलीकर सर यश जोशी पा. न. वळवडे समर्थ चुंनाडे, ना.वा.जोशी वेदांत शेवाळे, आर एन कुलकर्णी, पुष्कर कुलकर्णी, द ए बल्लाळ, शंतनू काळे, रा.गो. प्रभुणे रंजन काळे, तसेच जे टी भिंगारदेवे, गणपतराव कणसे, गोकुळ अहिरे या मुख्याध्यापकांच्या भूमिकेत काम केले.
या कार्यक्रमाची संकल्पना व लेखन मकरंद किर्लोस्कर यांनी केले. संगीत संयोजन संगीता काने, नृत्यदिग्दर्शन आसावरी पंडित, वेशभूषा व रंगभूषा प्रशांत कुलकर्णी व सुरेश कांबळे यांनी केले.
Comments
Post a Comment