कराडच्या अवाजवी पाणीपट्टी विरोधात नागरिकांची नगरपालिकेत धाव;विविध संघटनेच्यावतीने निवेदन...
कराड दि.17- (प्रतिनिधी) कराड नगरपरिषद कडून 24 तास पाणी योजनेअंतर्गत शहरातील नागरिकाकडून शुल्क घेऊन पाण्याचे मीटर बसवण्यात आली आहेत. मात्र 24 तास योजना अद्याप चालू झालेली नाही. योजना सुरू होण्यापूर्वी सुरू असलेला पाणीपुरवठा त्यातही मंगळवार व शनिवार एकच वेळ पाणी येत होते त्याच पद्धतीचा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. मात्र तरीही नगरपालिकेने एप्रिल 2022 पासून मीटर प्रमाणे पाणीपट्टी आकारणी सुरू केलेली आहे. ही आकारणी गैरवाजवी व सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज कराड शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना निवेदन दिले.
कराड नगर परिषदेकडून अध्याप ही 24 तास योजना पूर्णपणे कार्यान्वित नसताना पूर्वी ज्या पद्धतीने पाणीपुरवठा होत होता त्याच पद्धतीने तो केला जात आहे. त्यामुळे पूर्वीचा दोन वेळचा पाणीपुरवठा हा मीटर प्रमाणे बिल आकारणी न करता वार्षिक बिलाप्रमाणेच आकारणी करावी अशी ही मागणी नागरिकांतून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मीटर प्रमाणे पाणीपट्टी आकारणी जी सुरू आहे ती सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी असल्याचेही नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
कराडच्या या 24 तास पाणीपुरवठा योजनेवरून गेली काही वर्ष सुरू असलेला विलंब व त्यानंतर मीटर प्रमाणे सुरू झालेली आकारणी याबाबत शहरात नागरिकांमधून नाराजी उमटली आहे. अनेक वेळा शहरातील विविध संस्था संघटना पक्ष यांच्यावतीने या पाणीपट्टी आकारणीबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारीही करण्यात आले आहेत मात्र तरीही पाणीपुरवठा आकारणी मीटर प्रमाणे सुरू केली मात्र ती न परवडणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आज सकाळी शहरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र जमून कराडच्या उप मुख्याधिकारी विशाखा पवार यांना सध्या सुरू असलेल्या या पाणीपुरवठा आकारणी बाबत चे निवेदन सादर केले आहे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने जन आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान कराडची ही 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ झाला तेव्हापासून कराड शहरात नगरसेवक म्हणून काम केलेल्या नगरसेवकांची मात्र सध्या सुरू असलेल्या पाणीपट्टी आकारणीबाबत काय भूमिका आहे? हे मात्र नागरिकांना अद्याप कळालेले नाही. ज्या नगरसेवकांच्या कार्यकाळात ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईपर्यंत व या योजनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करून त्याच्या माध्यमातून पाणीपट्टी आकारणी सुरू केली मात्र यावर संबंधित नगरसेवकांनी आपली भूमिका नागरिकांच्या समोर मांडणे उचित होईल अशी ही नागरिकांच्या मध्ये चर्चा सुरू आहे. योजना काळातील सर्व माजी नगरसेवकांची शहराप्रति कोणतीच जबाबदारी नाही का? असा सवाल ही नागरिक करू लागले आहेत.


Comments
Post a Comment