अथणी - रयत शुगर्सकडून प्रति मे.टन ₹३५०० प्रमाणे एकरकमी ऊस बिल जमा
अथणी - रयत शुगर्सकडून प्रति मे.टन ₹३५०० प्रमाणे एकरकमी ऊस बिल जमा
कराड, दि. 3 - शेवाळेवाडी (म्हासोली) येथे कार्यरत अथणी शुगर्स लि. – रयत युनिट या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रति मे.टन ₹३५००/- प्रमाणे एकरकमी ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सीएफओ योगेश पाटील यांनी दिली.
यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील–उंडाळकर व युनिट हेड रविंद्र देशमुख उपस्थित होते.
कारखान्याने चालू हंगामात आजअखेर १.५४ लाख मे.टन गाळप पूर्ण केले आहे. तसेच १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गाळपास झालेल्या सर्व ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती देण्यात आली.
अथणी–रयत शुगर्सने नेहमीप्रमाणे यावर्षीही वेळेत ऊस बिल देण्याची परंपरा कायम राखली असून शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
कारखान्याकडून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, चालू गळीत हंगामात अधिकाधिक प्रमाणात ऊस पुरवठा करून सहकार्य करावे.

Comments
Post a Comment