स्टेडियम कामामुळे नागरिकांची गैरसोय; पर्यायी मैदानाची व्यवस्था करायला हवी होती - चव्हाण

 

स्टेडियम कामामुळे नागरिकांची गैरसोय; पर्यायी मैदानाची व्यवस्था करायला हवी होती - पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 1 : कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर तीव्र टीका करत महत्त्वाचे मुद्दे मांडले. यंदा काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच हातच्या चिन्हावर कराड नगरपालिका निवडणूक लढवत आहे, याची चव्हाण यांनी विशेष नोंद घेतली.

स्टेडियम कामामुळे नागरिकांची गैरसोय – पर्यायी मैदानाची व्यवस्था न केल्याची खंत

कराड शहरात सुरू असलेल्या स्टेडियम बांधकामाबाबत बोलताना ते म्हणाले की, “काम सुरू करण्याआधी पर्यायी मैदानाची व्यवस्था केली असती तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. घाईगडबडीत निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.”

5 वर्षे रखडल्या निवडणुका, आता घाईगडबडीचा गोंधळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षे लांबल्या गेल्यानंतर आता अचानक जाहीर झालेल्या निवडणुकांवरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “घाईगडबडीत निवडणुका जाहीर केल्याने निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे.”

एपस्टाईन फाईल्सबाबत प्रतिक्रिया

अमेरिकेत चर्चेत असलेल्या एपस्टाईन फाईल्स संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटची पत्रकारांनी विचारणा केली असता चव्हाण म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे आहे. कदाचित येत्या महिनाभरात देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकतो, अशी राजकीय परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे,” असा उल्लेख त्यांनी केला.

लाडकी बहीण योजनेवर सरकारला टार्गेट

राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबतही ते सरकारवर टीका करताना म्हणाले, “या योजनेला आमचा विरोध नाही. मात्र कोणतेही स्पष्ट निकष न लावल्याने मूळ वंचित आजही वंचितच राहिले. दारिद्र्य रेषेखालील महिलांपर्यंत योजनेचे लाभ पोहोचतच नाहीत.”

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक