सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा मधील चंदा वाघीण (नवीन सह्याद्री मधील नाव तारा STR T 04 ) दाखल.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा मधील चंदा वाघीण (नवीन सह्याद्री मधील नाव तारा STR T 04 ) दाखल.

कराड, दि. 14 - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

सुमारे तीन वर्षांची ही वाघीण NTCA च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिचे acclimatization व निरीक्षण करण्यात येणार आहे. 

संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार पाडण्यात आली. 

या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले.

हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतींच्या अंमलबजावणीस वचनबद्ध आहे.

“ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली. WII च्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.”

तुषार चव्हाण - क्षेत्र संचालक – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

----------- 

 “सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थानांतरण हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.”

एम. एस. रेड्डी

प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य.

----------------

सदर ऑपरेशन तारा साठी क्षेत्र संचालक तुषार चव्हाण , विभागीय वनाधिकारी स्न्हेलता पाटील , सह्हायक वनसंरक्षक संदेश पाटील , सह्हायक वनसंरक्षक बाबासाहेब हाके , वनक्षेत्रपाल चांदोली ऋषीकेश पाटील , वनक्षेत्रपाल आंबा प्रदीप कोकितकर , वनक्षेत्रपाल ढेबेवाडी किरण माने , वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , आकाश पाटील वन्यजीव संशोधक व सर्व स्टाफ यांनी मोलाची भूमिका फार पाडली.

वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे व आकाश पाटील वन्यजीव संशोधक यांनी वाघीण निवड ते वाघीण पकडून ताडोबा ते चांदोली पर्यंत सुरक्षित आणण्याची अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली . 

बुधवार दिनांक १२.११.२०२५ रोजी दुपारी ४ वाजता वाघीण पकडण्याची मोहीम तोडोबा येथे चालू झाली , सदर वाघीण ५ वाजता पकडून पिंजर्यात बंदिस्त करण्यात आली . कागद पत्र ,वैद्यकीय सर्व तपासण्या , फिटनेस पाहून रात्री १० वाजता कराड च्या दिशेने प्रवास सुरु झाला , शुक्रवारी रात्री १.३० वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली . पुन्हा एखदा वैद्यकीय तपासण्या , फिटनेस पाहून पाहते ३.२० ला वाघीण एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज”करण्यात आले.

जवळपास १००० किमी चे अंतर २७ तास प्रवास करून वाघीण सुरक्षित खास वेगळ्या पिंजर्यातून चांदोली येथे दाखल झाली.

सदर सोडण्यात आलेल्या चंदा वाघिणीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील नवीन नाव तारा असे देण्यात आले आहे तर सांकेतिक क्रमांक STR T 04 असा आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक