प्रभाग सात मधून युवा नेतृत्व विनायक मोहिते निवडणूक लढवण्यास इच्छुक
प्रभाग सात मधून युवा नेतृत्व श्री विनायक मोहिते निवडणूक लढवण्यास इच्छुक...
कराड, दि. 12 - कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्ष, आघाडीच्या वतीने मेळावे सुरू आहेत. अनेक इच्छुकांची नावे ही समोर येऊ लागले आहेत. अशातच प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील एक युवा नेतृत्व म्हणजे श्री विनायक सदानंद मोहिते हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.
श्री विनायक मोहिते यांना कोणताही राजकीय वारसा, राजकीय पाठबळ नसताना एका सर्वसामान्य कुटुंबातून पूढे येत समाजकार्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी या नगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.
कोरोना काळात महत्वपूर्ण जबाबदारी
कोरोना काळात सर्वत्र हाहाकार माजला होता. कराड शहरात कोरोनाने शिरकावा केला होता. अशा परिस्थितीत या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांवर विनायक मोहिते यांनी अंत्यसंस्कार करत मोठ्या जोखमेचे काम केले होते. या कोरोना काळात संपूर्ण शहरात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली असतानाही अनेक जण कोविड स्मशान भूमी कडे जाण्यास भीत असताना विनायक मोहिते यांनी धाडस करत 29 कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.
श्री विनायक मोहिते यांनी श्रीकृष्णामाई यात्रेमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा केली होती त्याचबरोबर श्रीकृष्णामाई मंदिर येथे प्रसाद सेवेचा अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
गणेश उत्सव काळात कराडच्या कुंभारवाडा व इतर ठिकाणी नागरिकांसाठी गणपती बाप्पा आगमना दिवशी मोफत रिक्षा उपक्रम राबवला. या उपक्रमाबरोबरच गोमाता सेवा संघ या ग्रुपच्या मार्फत कराड येथील गोरक्षण मध्ये गोमातेसाठी वैरण स्वरूपी सेवा उपक्रम राबवला होता.
पावसाळ्या दरम्यान उद्भवलेल्या पूर परिस्थितीत श्री विनायक मोहिते यांनी पूरग्रस्तांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे पूर्वग्रस्तांसाठी मदत ही केली होती. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर पाईपलाईन दुरुस्तीच्या काळात शहरातील नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकर उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्यदिनी श्री विनायक मोहिते हे आपल्या प्रभागात आनंद उत्सव साजरा करत नागरिकांना जिलेबीचे वाटप करून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. समाजकार्य करताना प्रत्येक घटकाला न्याय मिळाला हवा या उद्देशाने विनायक मोहिते यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच सेवा वृत्तीचे हे काम सुरू ठेवले आहे.
श्री विनायक मोहिते या युवा नेतृत्वाने प्रभाग सात मध्ये वैयक्तिकरित्या विविध उपक्रम राबवत शहरासाठी व शहरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवत समाजकार्य केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभाग सात मधील सुज्ञ नागरिक निश्चितच आपल्या पाठीशी असल्याचा त्यांना विश्वास असल्याने त्यांनी समाजकार्य समाजसेवा करण्याच्या उद्देशाने प्रभाग सात मधून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.


Best of luck
ReplyDelete