वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धडाका


वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धडाका

कराड, दि. 14 : वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव (आप्पा) पाटील यांनी प्रचाराची जोरदार धडाकेबाज तयारी सुरू केली आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांनी गटातील सुमारे साडेआठ हजार कुटुंबांपर्यंत जाऊन दिवाळी किटचे वाटप केले.

सामाजिक दृष्टिकोन ठेवून राजकारणात सक्रिय असलेले नामदेवराव आप्पा पाटील हे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वारुंजी पंचायत समिती सदस्य असताना गणातील प्रत्येक गावात त्यांचा थेट संपर्क असून, समाजकार्यास प्राधान्य देणारे कार्य हेच त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास झालेला आहे. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून स्थानिक विकासाला चालना दिली आहे.

नामदेवराव आप्पा पाटील म्हणाले, “कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हा आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झाला आहे. कराडच्या जनतेला त्यांच्या विकासदृष्टीची जवळून जाणीव आहे.”

वारुंजी जिल्हा परिषद गट हा महिला राखीव असून, या गटात त्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, अशी माहिती त्यांनी दिली. “विकास हाच आमचा मुख्य मुद्दा असून, प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक