प्रभाग 8 मध्ये सौ. देवयानी डुबल यांना वाढता पाठिंबा; कोणत्या आघाडी कडून लढणार याची उत्सुकता

 


प्रभाग 8 मध्ये सौ. देवयानी डुबल यांना वाढता पाठिंबा; कोणत्या आघाडी कडून लढणार याकडे सर्वांचे लक्ष...

कराड, दि. 7 - कराड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोणाची आघाडी होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यात प्रभाग क्रमांक 8 मध्ये तर सर्वांचे लक्ष वेधले असून प्रभाग 8 मधील उमेदवार सौ. देवयानी दिग्विजय डुबल या कोणत्या आघाडी कडून तिकीट घेतात याकडे अनेकांच्या नजरा लागले आहेत. या प्रभागात सौ. डुबल यांची वाढती लोकप्रियता व मतदारचा वाढता जनसपंर्क यामुळे सर्वांचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

सौ. देवयानी दिग्विजय डुबल या व्यावसायिक व समाजकार्यात नेहमीच अग्रभागी असणारे दिग्विजय डुबल यांच्या पत्नी व माजी नगरसेवक शहाजीराव डुबल यांच्या सून आहेत. सौ. देवयानी यांना राजकीय वारसा असून समाजसेवा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. 1985 ते 1991 दरम्यान त्यांचे सासरे शहाजीराव डुबल हे कराड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून डुबल घराणे हे लोकांच्या नेहमीच जनसंपर्कात कायम असते. 

दरम्यान नगरपालिकेचे बिगुल वाजल्यानंतर सौ डुबल यांनी प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही आघाडीकडून तिकीट मिळो अगर ना मिळो आपण लोकांच्या सेवेसाठी या प्रभागातून लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सद्यस्थितीला या प्रभागातून सौ. देवयानी डुबल यांचा वाढता जनसंपर्क व त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता सध्याच्या स्थितीला त्यांचे पारडे जाड दिसत आहे. या प्रभागातील नागरिकांचाही त्यांना वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्या माध्यमातून सौ. डुबल यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 

प्रभाग आठ मधून सध्या देवयानी दिग्विजय डुबल यांच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरणाऱ्या सर्व प्रमुख पक्ष व आघाड्यांकडून बारकाईने लक्ष दिले जात असून त्या पाठीमागे विविध कारणे आहेत. डुबल घराण्याला पूर्वीपासून राजकीय व समाजसेवेची पार्श्वभूमी आहे. शहाजी डुबल यांनी नगरसेवक म्हणून काम केले असल्याने व प्रभागासह शहराचा राजकीय सामाजिक व समाजसेवेचा परिचय डुबल घराण्याला असल्याने त्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची चर्चा प्रभागात सध्या सुरू आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक