कराड अर्बन बँंकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला 'स्पेशल ज्युरी अँवार्ड-टीम' पुरस्कार
कराड अर्बन बँंकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला 'स्पेशल ज्युरी अँवार्ड-टीम' पुरस्कार
कराड, दि. 3 - आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त आणि भारतामध्ये (ACFCS-Association of Certified Financialcrime Speialists) याची प्रतिनिधी संस्था असलेल्या "FIN CRIME EXPERT' यांच्यातर्फे देण्यात येणारा मानाचा स्पेशल ज्यु्री अँवार्ड-टीम' (SPECIAL JURY AWARD-TEAM) हा पुरस्कार दि कराड अर्बन बंकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला मुंबई येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात भारत सरकारच्या वित्त मंत्रालय फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स सेलच्या संचालिका सौ. कनिका वाधवान यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार स्विकारण्यासाठी बंकैच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे,महाव्यवस्थापक सलीम शेख, महाव्यवस्थापक महेश वेल्हाळ, उपमहाव्यवस्थापक अमित रेठरेकर उपस्थित होते.
कराड अर्बन बंकेने सहकारी संस्थातील सेवकांच्या ज्ञानात भर घालून त्यांची कार्यक्षमता व कौशल्य वाढवण्यासाठी सन १९९९ पासून प्रशिक्षण केंद्र कार्यरत ठेवले असून सदरचे प्रशिक्षण केंद्र आता आधुनिकस्वरुपात, आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यास सज्ज केलेले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आजपर्यत ७० पेक्षा अधिक बँका, ८०० पेक्षा अधिक पतसंस्था, १२ हजारपेक्षा अधिक कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच १३०० पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात हे प्रशिक्षण केंद्र यशस्वी ठरलेले आहे.
कराड अर्बन बंकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्रामार्फत KYC-AML मधील सहकारी क्षेत्रात जागरुकता निर्माण करण्याकरिता गत २ वर्षापासून खास मराठीमध्ये विशेष "KYC-AML' प्रशिक्षण घेतले जात आहे. याप्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले जात आहे. या विशेष कामकाजाची नॉंद घेत "मIN CRIME EXPERT यांनी अर्बन बंकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्रास स्पेशल ज्युरीअबार्ड-टीम' हा पुरस्कार देवून गौरव केला आहे.
सेवक प्रशिक्षण केंद्रास 'स्पेशल ज्युरी अँवार्ड-टीम' पुरस्कार मिळाल्याबद्दल बँंकेचे सभासद व ग्राहक यांनीबंकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी,डॉ. सुभाष एएम, समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी, बंकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांचे विविध माध्यमांद्वारे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Comments
Post a Comment