कराडला रसायन युक्त बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...
कराड शहर पोलीस ठाणेची मोठी कारवाई...
रसायन युक्त बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...
तीन आरोपी अटक;एकुण 11,38,550/- रुपये किंमतीचे बनावट देशी दारु बनवण्याचे साहीत्य, रसायन युक्त बनावट देशी दारु जप्त
कराड, दि. 15 - सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए ताशिलदार यांना कराड शहरात बेकायदेशिर अवैद्य धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीत मोठी कारवाई करत मानवी जीवितास अपायकारक रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी अटक करण्यात आले असुन त्यांचे ताब्यातुन एकुण 11,38,550/- रुपये किंमतीची रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवण्याचे साहीत्यासह वनावट देशी दारु जप्त करण्यात आली आहे.
दिनांक 10/09/2025 रोजी कर्तव्यावर असताना सांयकाळी 6 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.ए. ताशिलदार यांनी सपोनी राजेश माळी व पथकास कराड शहर पोलीस ठाणेस बोलावुन सांगितले की कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत, सैदापुर गावचे हदीत जिव्हाळा ढाब्याचे समोरील बाजुस असले अपार्टमेंटमध्ये अवैध्यपणे मानवी जीवीतास अपायकारक असणारी रसायन मिश्रीत बनावट दारु बनवत असलेबाबत गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त आहे. सदरची बनावट दारु ही सध्या पांढरंगाचे स्कार्पिओ तसेच मारुती सुझुकी 800 या गाडीतुन घेवुन जाणार आहेत. सदर ठिकाणी जावुन तात्काळ कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथक यांनी तात्काळ माहिती मिळाले ठिकाणी जावुन अचानक पणे छापा टाकला असता 1) मयुर कृष्णदेव कदम रा. करवडी ता. कराड 2) विजय शिवाजी निगडे रा. शिरवळ ता. कराड 3) मंदार कृष्णदेव कदम वय 36 वर्षे रा. करवडी ता. कराड हे इसम पांढऱ्या रंगाचे स्कार्पिओ एम एच 12 जी के. 8256 वाहनामध्ये टैंगो पंच 180 मीली दारुच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या व टैंगो पंच असे लेबल असलेल्या 180 मीली भरलेल्या एकुण 15 दारुच्या बाटल्या सह मिळुन आले त्यांचे ताब्यात असले मारुती सुझुकी 800 एम एच 12 सी ए 774 या गाडीची पाहणी केली असता रसायन भरुन ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टीकच्या 6 कॅन मिळुन आले सदर आरोपीना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता आरोपी यांने जिव्हाळा ढाब्याचे समोर असले अपार्टमेंटचे तिसऱ्या विंगचे चौथ्या मजल्यावर असले संदेश पाटील यांचे फ्लॅटमध्ये ते रसायन मिश्रीत बनावट टाँगो पंच देशी दारु बनवत असल्याची कबुली दिली सदर फ्लॅटची पाहणी केली असता, बॉटलिंग मशिन त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव नाही त्यास बाजुस नट बोलटांनी जोडलेली SINGLE - PHASE ASYNCHRONOUS MOTOR, व इतर साहित्य मिळुन आले असुन ते ताब्यात घेतले आरोपी कडुन दोन चारचाकी वाहना सह एकुण 11,38,550/- रुपये किंमतीचा रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवण्याचे साहीत्यासह रसायन युक्त बनावट देशी दारु जप्त केली आहे. आरोपी यांना एमसीआर मंजुर झाला असुन अधिकचा तपास पोउनि डीसले करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश माळी, सपोनी अशोक भापकर, पोउनि निखील मगदुम, कृष्णा डीसले, सतिश आंदेलवार, पोलीस हवा. अशोक वाडकर, संदीप कुंभार, सजन जगताप, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो.शि. मुकेश मोरे, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, आनंदा जाधव, मोसीन मोमीन, धीरज कोरडे, आकाश पाटील, सारंग कुंभार, ओंकार साळुंखे यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment