बापलेकाच्या मनोमिलनामुळे न्यायाधीश ही गहिवरले....

पितापुत्र यांच्यातील वाद मिटवल्याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी, दिलीप भा पतंगे, दिवाणी न्यायाधीश पी पी कुलकर्णी, अधक्ष दीपक थोरात व इतर

बापलेकाच्या मनोमिलनामुळे न्यायाधीश ही गहिवरले...

लोकन्यायालयामध्ये कराडात सव्वा सहा कोटीच्या तडजोडीसह रक्ताचे ऋणानुबंधही जुळले

कराड, दि. 14 - चार वर्षांपासून एकमेकाचे तोंडही न पाहणारे बाप लेक लोकन्यायालयाच्या निमित्ताने एकत्र आले आणि दोघातील कटुता संपवून एकमेकाला घट्ट मिठी मारली, मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले तर वडिलांनीही माझे चुकले असे सांगून मुलाची समजूत काढली, हे मनोमिलन पाहून न्यायालयांचे डोळेही पाणवले आणि चार वर्षांचा दुरावा एका लोकन्यायालयात संपुष्टात आला. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या फौजदारी आणि दिवाणी केसेस एका मिनिटात काढून दोघांनी एकत्र आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली घटना होती कराड येथील लोकन्यायालयातील! 

जाधववाडी ता पाटण येथील सुदाम वेंकट जाधव आणि त्यांचा मुलगा राजेश सुदाम जाधव यांच्यातील नातेसंबंध अत्यंत टोकाला गेले होते. दोघांनी एकमेकांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते तसेच धनादेश अनादरनचा खटलाही प्रलंबित होता. एकमेकांना पाण्यात पाहणारे बाप लेक यांच्यामध्ये न्यायाधीश आणि पक्षकारांचे विधीज्ञ आर पी गांधी, ओमकार पाटील व दीपक पवार यांनी सलोखा घडवून आणला, त्यामुळे रक्ताचे नाते पुन्हा एकत्र आले.

लोकांच्यातील तंटे- बखेडे सामंजस्याने मिटावे, सर्वांनाच न्याय झाला अशी भावना व्हावी व न्यायालयीन खर्च आणि वाद संपुष्टात यावा यासाठी राष्ट्रीय पातळीवर लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. कराड येथे झालेल्या लोकन्यायालयात तब्बल 6 कोटी 18 लाखांच्या तडजोडी सह काही भावनिक नाती ही पुन्हा एकत्र आली. एकमेकांवर असणारा द्वेष, राग याचे क्षणात प्रेमात रूपांतर झाले. झाले गेले पाठीवर टाकून यापुढे गुण्यागोविंदाने राहण्याच्या अनाभाका घेतल्या गेल्या आणि यापुढे न्यायालयाची पायरी चढायची नाही असा निर्धार काही जणांनी केला. 

कराड न्यायालयात सद्यस्थितीत एकूण 18610 केसेस प्रलंबित आहेत, त्यापैकी तीन हजार तीनशे दहा केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी तब्बल 496 केसेस सामंजस्यांनी मिटल्या तर वादपूर्व निकाली केसेस जवळपास 200 न्यायालयात येण्यापूर्वीच मिटवल्या गेल्या. त्यामुळे कराड न्यायालयात एकूण 696 केसेस लोकन्यायालयात सामंजने मिटल्या गेल्या. 

कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी व दिलीप भा. पतंगे यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अपघात प्राधिकरण, धनादेश अनादरन, तडजोडीपात्र खटले आणि दावे या प्रकरणांचा लोकन्यायालयात समावेश करण्यात आला होता. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात आणि सर्व वकील सदस्यांनी सदरील लोकन्यायालय यशस्वी होण्याकरता प्रयत्न केले, न्यायाधीश पॅनल मध्ये एका वकील सदस्याचा सहभाग नोंदवण्यात आला होता. सदरील लोकन्यायालयात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस बी तोडकर, एस डी कुरेकर, पी एल घुले, के आर खोंद्रे, श्रीमती जे जे माने, दिवाणी न्यायाधीश एस एम बोमिडवार, श्रीमती पी एस भोसले, श्रीमती ए. वी. मोहिते, पी पी कुलकर्णी आणि अतुल ए उत्पात हे विधी अधिकारी पॅनल प्रमुख म्हणून कार्यरत होते. सदर लोकन्यायालय यशस्वी होण्याकरता वकील वर्गासह सर्व न्यायालयीन अधीक्षक सहा अधीक्षक कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षकारांनी अनमोल योगदान दिले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक