कराड येथे नेत्रदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन


कराड येथे नेत्रदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन

कराड नेत्रतज्ञ संघटनेचा पुढाकार; रॅलीचे रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी आयोजन

कराड, दि. 3 (प्रतिनिधी ) - राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या निमित्त कराड येथे 7 सप्टेंबर रोजी कराड नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने 'नेत्रदान जनजागृती बाईक रॅली'चे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण ढगे यांनी आज कराड हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेच्या सचिव सविता देवकर यांच्यासह डॉ. विजय करंबेळकर, डॉ. राहुल फासे, डॉ. अविनाश बिचकर, डॉ. योगेश राजगुरू, डॉ. सुनंदा पवार,  डॉ. अनिकेत ढगे डॉ. श्वेता ढगे,  डॉ. प्राजक्ता पाटील,  डॉ. ऋतुजा खोत, डॉ. ज्ञानेश शिर्के यावेळी उपस्थित होते.

नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर डोळे दान करणे, त्यामुळे अंधत्व असलेल्या व्यक्तीला दृष्टी परत मिळवता येते हे या नेत्रदानातलं एक महत्त्वाचे कार्य असून नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात साजरा केला जातो. ज्यामुळे लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगितले जाते. त्यासाठी देशभरात या पंधरवड्यात विविध उपक्रमांच्या आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून कराड शहरात कराड नेत्रतज्ञ संघटनेच्या व आयएमए कराड तसेच कृष्णा हॉस्पिटल व इतर संघटनांच्या वतीने नेत्रदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दत्त चौक येथे करण्यात आले असल्याचे  सांगण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ  कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

संपूर्ण भारतात जवळपास दीड कोटी लोकांचे बुबुळ खराब झाल्यामुळे त्यांना अंधत्व आले आहे. दरवर्षी साधारण दोन लाख लोकांना नेत्रदान करण्याची गरज भासत असून त्यासाठी अशा जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना नेत्रदानाचे महत्त्व कळावे व त्या अनुषंगाने त्याची जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश असून त्यासाठी कराड नेत्रतज्ञ संघटनेचा हा उपक्रम आयोजित आहे.

नेत्रदान केव्हा करावे!

तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर लवकरात लवकर तुमच्या जवळील नेत्रतज्ञ किंवा नेत्र पिढीला फोन करावा. मृत्यूनंतर चार ते सहा  तासांच्या आत ही प्रक्रिया करावी लागते. मृत व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पंखा बंद करावा, डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवाव्यात म्हणजे बुबुळ कोरडे पडणार नाही. मृत व्यक्तीच्या चेहऱ्याला विद्रुपपणा न येता चेहरा तसाच्या तसा राहतो.

मृत व्यक्तीचा संपूर्ण डोळा बदलला जातो का? 

मृत व्यक्तीचा संपूर्ण डोळा न बदलता  डोळ्याचा पुढचा भाग म्हणजे कोर्निया पारदर्शक पटल काढला जातो. नेत्रदानामध्ये फक्त हा भाग काढला व बदलला जातो. 

नेत्रदानाचा फायदा कोणाला होईल?

नेत्रदानाचा फायदा अशा लोकांना होईल ज्यांचा बुबुळ खराब झाला आहे. आपल्या भागामध्ये विशेषता शेतकऱ्यांना डोळ्यावर जखम होऊन फुल पडते त्या लोकांना किंवा कुठल्याही इतर कारणामुळे पारदर्शक बुबुळ पांढरे झाले असेल त्यांना व डोळ्यावरती मार लागला असल्यास औद्योगिक क्षेत्रात काम करताना डोळ्यांना जंतूचा प्रादुर्भाव झाल्यास, जन्मजात पांढरे बुबुळ असल्यास नेत्रदानाचा फायदा होतो.

नेत्रदान कोण करू शकतात 

नेत्रदान वय वर्ष दोन पासून लिंग रक्तगट यांचा विचार न करता कोणीही करू शकतात उच्च रक्तदाब मधुमेह असलेले व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. 

नेत्रदान कोण करू शकणार नाही 

ज्या लोकांना कॅन्सर, एच आय व्ही, हिपॅटायटीस, रेबीज झालेले असेल किंवा त्यांचा मृत्यू काही अनैसर्गिक कारणामुळे झाला असेल अशा व्यक्तीचे नेत्रदान करता येत नाही.

नेत्र पेढी Eye Bank म्हणजे काय 

मित्रपेढी एक संस्था आहे जिथे भूगोल जतन करून ठेवले जाते आणि नेत्रहीनांना दृष्टी देण्यात ते उपयुक्त ठरतात कोर्निया केवळ जास्तीत जास्त 14 दिवसांच्या कालावधीसाठी एमके मिडीयम मध्ये संरक्षित केले जाऊ शकते.

कराडमध्ये नेत्रपेढी कुठे आहे 

कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेत्र पिढी कार्यरत आहे. त्या ठिकाणी कळवल्यास तात्काळ डॉक्टरांची टीम येऊन योग्य प्रक्रिया करतात.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक