आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मभूषण बाबा कल्याणी यांना जाहीर

आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मभूषण बाबा कल्याणी यांना जाहीर

कराड, दि.1 : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात यंदाचा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2025’ आंतरराष्ट्रीय किर्तीचे उद्योगपती, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबा एन. कल्याणी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र माने, विजय साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, संयोजक समिती सदस्य अल्ताफहुसेन मुल्ला, सौ. शोभाताई पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. गुजर म्हणाले, कराडचे सुपुत्र स्व. पांडुरंग दादासाहेब पाटील तथा पी. डी. पाटीलसाहेब यांच्या गौरवार्थ आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेली तीस वर्षाहून अधिक काळ कराड येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय सन 2011 पासून घेतलेला आहे. ज्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर नेली, अशा व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

2011 सालचा प्रथम पुरस्कार हा जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर आज अखेर प्रतिष्ठानच्यावतीने कु. नसिमा हुरजूक, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. अभय बंग, डॉ. जब्बार पटेल, डॉ. रणजित जगताप, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. चंद्रकांत लोखंडे व अरुण जोशी या ज्येष्ठ विभूतिंना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नुकतीच प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यतेखाली झालेल्या प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये सन 2025 चा आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबा कल्याणी (पुणे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बाबा कल्याणी हे भारत या कंपनीनेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे तसेच ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कल्याणी यांना केलेल्या उत्तुंग कार्याद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

सदर पुरस्काराचे वितरण स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पुण्यतिथीदिवशी दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक करण्यात येणार असल्याचे डॉ. गुजर यांनी सांगितले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक