कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड
कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश अरुण कुर्ले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने केली असून निवडीचे नियुक्ती पत्र नुकतेच कुर्ले यांना देण्यात आले आहे.
कराड शहरातील नागेश कुर्ले हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यशवंतराव चव्हाण ऑटो रिक्षा गेटचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडी गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याअध्यक्ष राहूल होनकळस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वाहतूक आघाडीची बैठक झाल्यानंतर वाहतूक आघाडीच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
मा.श्री. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने कुर्ले यांची रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वाहतूक आघाडी कराड तालुका अध्यक्ष या पदी २ वर्ष कालावधी साठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल वाहतूक आघाडीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
आज वाहतूकदारांना खंबीर नेवृत्त्वाची गरज असून त्यांची विश्वासाहर्यता जपणे ही महत्त्वाची बाब आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने मा. श्री. रामदासजी आठवले यांना अभिप्रेत असणारी वाहतूक संघटना उभारली गेली पाहिजे. रीपब्लिकन वाहतूक आघाडीच्या वतीने पुढील कार्यात वाहतूकदरांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तत्परता दाखवून सक्रिय रहावे, अशी अपेक्षा वाहतूक आघाडीने व्यक्त केली आहे.
नागेश कुर्ले यांना वाहतूक संघटनेच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment