शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे; दत्तात्रय खरात
मलकापूर - माजी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करताना शेती कृषी मित्र अशोकराव थोरात व इतर मान्यवर.
शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे; दत्तात्रय खरात
कराड, दि. 9 - या देशातील व महाराष्ट्रातील शेती व शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीवर आधारितच अर्थव्यवस्था सेवा उद्योग व इतर उद्योगांना जिवंत ठेवते याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे असे उद्गगार माजी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी काढले.
कराड तालुक्यातील माजी कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांचा सेवापुर्ती कार्यक्रम परिसरातील प्रगतशील प्रयोगशील उपक्रमशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या वतीने आदर्श जुनियर कॉलेज मलकापूर या ठिकाणी संपन्न झाला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी शेतीविषयक सरकारची अनास्था व चुकीच्या धोरणामुळे आज शेती व शेतकरी अडचणीत आला आहे असे प्रतिपादन केले. भारत हा एक कृषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे जर शेती व शेतकरी यांना सक्षम ठेवायचे असेल तर शासनाची शेती विषयक नवीन धोरणे कायदे ध्येय असायला हवीत. त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांनी फक्त कागद न रंगवता प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीचे परीक्षण करून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. दत्तात्रेय खरात यांच्यासारखे चांगले कृषी अधिकारी निर्माण व्हायला हवेत तरच शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन व दिलासा मिळेल.
या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन मळाई ग्रुप व लक्ष्मी देवी शेतकरी मंडळ मलकापूर यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित कराड तसेच विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी विज्ञान प्रबोधिनीचे सर्व संचालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सुनील ताकटे कृषी अधिकारी, श्री शेखर शिर्के कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजच्या विभाग प्रमुख सौ शीला पाटील मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन सौ खंडागळे मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्राचार्य सौ कुंभार अरुणा मॅडम यांनी केले.

Comments
Post a Comment