खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे क्रीडामंत्र्यांचे आदेश

मुंबई : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण पाहताना क्रीडा मंत्री ना. दत्तात्रय भरणे. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले, तहसीलदार कल्पना ढवळे, क्रीडा अधिकारी संगीता जगताप व अमृता पारकर.

खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे क्रीडामंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 5 : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडामंत्र्यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस्‌ यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे अमृता पारकर यांनी सांगितले. 

दरम्यान, क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्या.




Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक